पाझर तलाव दुरुस्ती कामे तात्काळ हाती घ्या - आ.अब्दुल सत्तार ;
खुल्लोड - जळकी - वसई येथे पाझर तलाव दुरुस्ती कामांचे उदघाटन ;
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 08गावा - गावातील पाझर तलावांच्या भिंतींवर काटेरी झुडूपे - तसेच गळतीमुळे पावसाचे पाणी थांबण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सदरील कामे चांगल्या दर्जाची करीत हि पाझर तलाव दुरुस्ती कामे तात्काळ हाती घेऊन पुर्ण करण्यासंदर्भात संबंधित यंञणेस सुचना देण्यात आल्या.
जलयुक्त शिवार योजनांतर्गत ( जलसंधारण) खुल्लोड - जळकी - वसई येथील पाझर तलाव दुरुस्ती कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
खुल्लोड - जळकी - वसई येथील पाझर तलाव दुरुस्ती कामे तात्काळ हाती घेण्यात येणार असल्याने सदरील तलावांमधील पाणी पाझरण्याचे प्रमाण खूपच कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होऊन शेतक-यांसाठी सिंचन क्षेत्रात वाढ होऊन मोलाचे ठरणार असल्याने गाव - परिसरातील शेतक-यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खुल्लोड - जळकी - वसई परिसरातील पाझर तलाव दुरुस्ती कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देवीदास पाटील लोखंडे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय मुरकुटे, पांडुरंग गवळी,बाजीराव वाघ,विठ्ठलराव वाघ,कैलास वाघ,रामेश्वर वाघ,बाळासाहेब वाघ,सयाजीराव वाघ,सिताराम वाघ,छगणराव वाघ,अजिनाथ पंडित,रामेश्वर कोठारे,प्रविण वाघ,जगण वाघ,शेषराव सनान्से,इंजिनिअर सोनवणे,दांडगे,यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें