गीताबाई चारठाणकर पुरस्कार निर्मलाताई कांदळगावकर यांना जाहिर.
सेलु प्रतिनिधि.दि.१2/06/2018.समशेर खान.येथिल महिला मंडळाच्या वतिने दरवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा "वीर महिला सौ.गीताबाई चारठाणकर पुरस्कारासाठी" औरंगाबाद येथिल सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई कांदळगावकर यांची निवड करण्यात अाली असल्याची माहिती महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांनी दिली.
इ.स.१९९५ पासून सातत्याने महिला मंडळाच्या वतिने "वीर महिला सौ.गीताबाई चारठाणकर पुरस्कार" मराठवाडा पातळीवर शैक्षणिक,साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेञात बहुमोल कार्य करणार्या एका महिलेची निवड करून देण्यात येतो.यावर्षी—२०१८ च्या पुरस्कारासाठी औरंगाबाद येथिल सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई कांदळगावकर यांची निवड करण्यात अाली अाहे.निर्मलाताई कांदळगावकर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहूण्या म्हणून लातुर येथिल डाॅ.जोत्स्ना कुकडे यांची उपस्थिती राहणार अासून त्या "चला ओळखु या स्वत:ला" या विषयावर मार्गदर्शन करणार अाहेत.या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई कोठेकर या असणार अाहेत.पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मापञ व रोख एक हजार एकशे एक रूपये असे असणार अाहे.पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता.१९) रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील नूतन विद्यालयाच्या (कै.) रा.ब.गिल्डा सभागृहात संपन्न होणार अाहे.या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अावाहन विजया कोठेकर, श्रीमती ललिता गिल्डा, रोहिणी कुलकुर्णी, रजनी सुभेदार, वर्षा डोंगरजकर, वरूणा चारठाणकर, बाबासाहेब चारठाणकर,डाॅ. राजाभाऊ चारठाणकर, वामनराव वाईकर यांनी केले अाहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें