महावितरणचा गलथान कारभार,शिवसेना घालणार घेराव व ठिय्या अांदोलन.
सेलू (प्रतिनिधि):येथिल महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराला सेलू शहर व ग्रामिण भागातील नागरिक पुरते वैतागले असून या महावितरणच्या विरोधात येथिल शिवसेनेच्या वतिने गुरूवार 21रोजी महावितरण कार्यालयाला घेराव व ठिय्या अांदोलन करण्यात येणार असल्याने निवेदन येथिल उपविभागीय अधिकारी यांना देण्यात अाले अाहे.येथिल महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी तालुक्यातील ग्राहकांना वेठीस धरत अाहेत.वारंवार सूचना व लेखी तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी दूर्लक्ष करित अाहेत.सेलू शहरासह ग्रामिण भागात बर्याच विद्यूत खांबावरिल विद्यूत तारा खाली लोंबकळ्या असून या विद्यूत तारांमुळे नागरिकांचा जिव धोक्यात अाला अाहे.अनेक विद्यूत खांब गंजले असून मोडकळीस अाले अाहेत.ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके देण्यात येत अाहेत.विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यास किंवा काही बिघाड झाल्यास ग्राहकांनी संबधित अधिकारी व कर्मचार्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला तर ते उर्मट अधिकारी व कर्मचारी दूरध्वनी उचलत नाहीत.शहरातील गायञी नगरातील मागील दोन वर्षापासून वादळी वार्याने नूकसान झालेले तार, विद्यूत खांब अद्यापही जैसे थेच अाहेत.या कार्यालयात अधिकार्यांच्या संगणमताने दलालांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून दूरूस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बीले उचलण्याचा प्रकारही या कार्यालयातील अधिकाःर्यांनी केला अाहे.या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.शहरातील प्रत्येक वार्डातील रोहिञांना निकृष्ट दर्जाचे सामान बसविण्यात अाले असल्याने या रोहिञांवर वारंवार बिघाड होत अाहे.या महावितरणच्या ञासाला ग्राहक कंटाळले असल्याने शिवसेनेच्या वतिने गुरूवारी महावितरणच्या कार्यालयाला घेराव व ठिय्या अांदोलन करण्यात येणार अाहे.उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक मनिष कदम, युवासेनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग शेळके, विजय गायकवाड, शिवाजी कदम, गुलाब खेडेकर, कृष्णा काटे, एकनाथ सोळंके यांच्या स्वाक्षर्या अाहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें