मंठा शहरात नगर पंचायत कडुन वॉर्डात दुषित पाण्याचा पुरवठा ,, तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामा करावा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

मंठा शहरात नगर पंचायत कडुन वॉर्डात दुषित पाण्याचा पुरवठा ,, तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामा करावा.

मंठा शहरात नगर पंचायत कडुन वॉर्डात दुषित पाण्याचा पुरवठा ,, तहसीलदार यांनी  तात्काळ पंचनामा करावा.


मंठा /हाफेज शबाब

मंठा शहरातील वॉर्ड क्रमांक 9 नव मधील शुध्द  पाणी पुरवठा करण्यास नगर पंचायत अपयशी ठरली आसुन दुषित पाणी पुरवठा होत आसल्याची तक्रार सुजाण नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मुलन समितीचे हलीम कुरैशी व विलास गोंडगे यांच्या  कडुन मुख्याधिकारीकडे निवेदन द्वारे  तक्रार करण्यात आली आहे.


सद्या पावसाळा सुरू आहे .  कुठेतरी  लेकेज  झालेले पाईप लाईन मुळे नालो नालीत घाण पाणी ह्या रस्त्यावरील  खड्ड्यात येऊन साचत आहे . परिणामी हेच पीणी नागरिकांना वापरण्यात येत असल्याने आरोग्यवर  परिणाम संडास ,उलटी, तर काही जण ताप, चक्कर येऊन , खाली पडतात यामुळेच नागरिकांनाचे आरोग्य  बिघडले असल्याचे निवेदनवर नमूद केले आहे. याची संपुर्ण  जबाबदारी  नगर पंचायत वर राहील आशीही निवेदनावर नमुद केलेले आहे .


वॉर्डातील नळाला येणारे  घाण पाणी पुरवठाचे नमुने घेऊन नगर पंचायत व तहसीलदारानी  आरोग्यास घातक  ठरणारा हा दुषित पाणी पुरवठा त्वरित बंद करावा आणि पंचनामा करून शुध्द पाणी पुरवठा करावा आशी मागणी केली आहे.

         या निवेदनानंतर संबंधित यंत्रणेने दखल न घेतल्यास तीव्री स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा देण्यात आला आहे.

    या निवेदनावर सुजाण नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मुलन समितीचे हलीम कुरैशी व विलास गोंडगे यांच्या स्वक्षर्या आहेत.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें