शरीर सदृड तर जीवन सुखी*-नंदिकेश्वर शिवाचार्य.जगता येते म्हणून योग-प्राणायामाची गरज- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

शरीर सदृड तर जीवन सुखी*-नंदिकेश्वर शिवाचार्य.जगता येते म्हणून योग-प्राणायामाची गरज- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज.

शरीर सदृड तर जीवन सुखी*-नंदिकेश्वर शिवाचार्य.जगता येते म्हणून योग-प्राणायामाची गरज- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२०जून २०१८
आपले शरीर सदृड व निरोगी ठेवायचे असेल तर योग व प्राणायाम नियमित करने आवश्यक आहे असे मत नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
सोनपेठ येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य पतंजली योग समिती आयोजित पाच दिवसीय मोफत भव्य योग-प्राणायाम शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज म्हणाले की; मानवाचे शरीर सदृड असेल तरच जीवन सुखी जगता येते म्हणून योग-प्राणायामाची गरज असून या साधनेला वयाची गरज नसून आपण आपल्या उर्वरित निरामय आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. पतंजली योग समितीच्या अशा उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करून सुरुवात करण्यात आली यावेळी उदघाटन प्रसंगी उदघाटक श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माजी आमदार व्यंकटराव कदम, पतंजली योग समितीचे नागनाथ सातभाई, मोहन चौलवार, नागनाथ कोटुळे, उमेशअप्पा नित्रुडकर, राधाकिशन हिक्के पाटील, बाबासाहेब कदम, ज्ञानेश्वर डमढेरे, पत्रकार किरण स्वामी, संध्याताई कदम, वंदनाताई लोहगावकर, मयुरी देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करत दीपप्रज्वलन केले मुख्य शिबीर योग प्रशिक्षक प्रा.विठ्ठल जायभाये यांनी उपस्थित सर्व महिला, पुरुष व तरुणांना योग-प्राणायाम स्वतः करत प्रत्येक आसन व प्राणायाम चे फायदे तोटे, कधी करावा कधी करू नये त्याचे नियम संपूर्ण माहिती सांगत मंचावरून योग प्रचारक मोहन चौलवार, प्रा.विठ्ठल जायभाये व नागनाथ सातभाई यांनी प्रत्यक्षीके दाखवली. यावेळी रत्नपारखे सर, कोटलवार सर, जोशी सर, संतोष निर्मळे, राजाभाऊ पांपटवर, भक्तराज गागर्डे, बारगजे, वडकर, रोहित स्वामी आदींनी परिश्रम घेतले तसेच पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यासाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून एक दिवसच नाही तर या शिबिरात पाच दिवस आणि आपल्या स्वतःला तंदरुस्त ठेवण्यासाठी दररोज योग-प्राणायाम करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें