खरिप हंगामासाठी शेतक-यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात सुचना=आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश.
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 07खरिप हंगामासाठी शेतक-यांना ताबडतोब कर्जपुरवठा करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून संबंधितांना सूचित करण्यात आले असून माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.
थोड्याच दिवसात 2018 - 19 हंगाम सुरू होणार असून हवामान खात्याने पाऊस वेळेवर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी कर्जबाजारीपणामुळे हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे. खरिप हंगामात पेरणी - शेतीमशागत करण्यासाठी शेतक-यांकडेच पैसा नाही शेतक-यांचे मनोबल व धैर्य खचू नये म्हणून या खरिप हंगामासाठी पेरणी व इतर शेतीमशागत करण्यासाठी तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात संबंधित यंञणेस आदेश द्यावेत तसेच शेतक-यांना बांधावर खते व उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करुन देण्यासही आदेशीत करावे या संदर्भात माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी शासनदरबारी आवाज उठवून सरकारला 100 टक्के कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना ताबडतोब कर्जपुरवठा करण्यासंदर्भात मागणी करीत विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देऊन पाठपुरावा केला असता मागणीसंदर्भात यश मिळाले आहे.
छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017 (classy.2017) अंतर्गत 100 टक्के कर्जमाफी मिळालेल्या शेतकरी सभासदांना अल्पमुदत पिक कर्ज वितरीत करण्यासंदर्भात मा.सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे,मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद व मा.जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था औरंगाबाद यांचे कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें