पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी येथे आज ( दि १ रोजी ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुसाट वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने घरावरील पत्रे उडून दगडे खाली पडल्याने चार जण गंभीर जखमी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी येथे आज ( दि १ रोजी ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुसाट वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने घरावरील पत्रे उडून दगडे खाली पडल्याने चार जण गंभीर जखमी.

पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी येथे आज ( दि १ रोजी ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुसाट वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने घरावरील पत्रे उडून दगडे खाली पडल्याने चार जण गंभीर जखमी.


मुनाफ पटेल
पैठण तालुका प्रतिनिधी
दि १पैठण तालुक्यातील होनोबाची वाडी येथे आज ( दि १ रोजी ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुसाट वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने घरावरील पत्रे उडून दगडे खाली पडल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमी झालेल्यांमध्ये सासुरवाडीत धोंड्याचे जेवण खाण्यासाठी आलेल्या एका जावयाचा सुद्धा समावेश आहे.
आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक होनोबाची वाडी शिवारात सुसाट वादळी वारा सुटल्याने अख्या वाडीवरील घराचे पत्रे उडाले तर घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.वाडीलगतच देवचंद बिघोत व लालसिंग बिघोत या दोघां भावांची शेती असून ते संपूर्ण कुटुंबियांसह शेतातच राहतात.आज सायंकाळी तुफान वारा सुटल्यामुळे त्यांची आई हिराबाई बिघोत व मुलगी प्रतिक्षा बिघोत या दोघी जणी घरात बसल्या होत्या त्या घरावरचेच संपूर्ण पत्रे उडाल्याने प्रतिक्षा हिचा पाय चिरला तर हिराबाई यांच्या डोक्यात पत्र्यावरील दगड पडल्याने या दोघेही गंभीर जखमी झाल्या आहेत.तर आशाबाई बहुरे व विजय गुसिंगे यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.सध्या धोंड्याचा महिना सुरु असल्याने विजय गुसिंगे हे कवचलवाडी ( ता अंबड ) येथून आपल्या सासुरवाडीत परिवारासह धोंडा खाण्यासाठी आले होते.देवचंद बिघोत यांच्या एका बकरीच्या पिल्लाच्या अंगावर छपरासह पत्रे पडल्याने पिल्लू जागीच ठार झाले तर लालसिंग बिघोत यांच्या मालकीच्या १५ कोंबड्या गारांच्या पाऊसामुळे दगावल्या.लालचंद जारवाल यांच्या घरावर बाभळीचे झाड पडल्याने झाडाखाली उभी केलेली दुचाकी व घराचे नुकसान झाले.या सुनामी घटनेमुळे ठीक ठिकाणी विद्युत खांब व झाडे उन्माळून पडल्याने विद्युत तारा हि तुटून पडल्या त्यामुळे होनोबाची वाडी शिवारातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.रोशन वैष्णव,रामचंद्र जारवाल,किसन जारवाल,शंकर वैष्णव,मदन जारवाल,विठ्ठल जारवाल,प्रताप बिघोत,सजन बहुरे,बंडू डेडवाल,महाजन कावाळे,हरसिंग महेर,गोवर्धन जारवाल,भागचंद जारवाल,अशोक वैष्णव आदींच्या घरावरील पत्रे उडून पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.अशा या गंभीर घटनेमुळे येथील ग्रामस्थांनी आपल्या आजूबाजूच्या गावात दुसऱ्या नातेवाईकांच्या ठिकाणी आज रात्री असरा घेतला आहे.विशेष म्हणजे एवढी मोठी गंभीर घटना घडूनही वाडीत एकही शासनाचा अधिकारी तसेच पदाधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आला नाही.या घटनेत अंदाजे किती रुपयांचे नुकसान झाले याचा आकडा समजू शकला नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें