मान्सुनपूर्व नियोजनाकामी नगरपालीकेची बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

मान्सुनपूर्व नियोजनाकामी नगरपालीकेची बैठक संपन्न.

मान्सुनपूर्व नियोजनाकामी नगरपालीकेची बैठक संपन्न.

सिल्लाेड दि.२ ( संतोष लहाने )

मान्सुनपूर्व नियोजन कामे हाती घेण्यासाठी सिल्लाेड नगरपालीकेची महत्वपूर्ण बैठक आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी( दि 0२)रोजी संपन्न झाली.शहरातील साफ सफाई करण्याचे नियाेजन बैठकीत घेण्यात आले.

मान्सुन यंदा लवकर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहरातील नाले,गटारी यांची स्वच्छता करणे गरजेचे असून सफाई कामांची सुरुवात युध्द पातळीवर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पावसाचे पाणी नागरी वसाहतीत शिरणार नाही याची दक्षता नगरपालीकेने घेणे गरजेचे असल्याची सुचना आ.अब्दुल सत्तार यांनी नगरपालीका यंत्रनेला दिली.
शहराची वाढलेली व्याप्ती पहाता पावसाळ्यात नागरीकांना कुठलाही त्रास हाेऊ नये याची खबरदारी नगरपालीकेने घ्यावी अशी सुचना करत शहराची स्वच्छता व सुंदरता अबाधीत रहावी यासाठी कायम तत्पर रहावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,उपनगराध्यक्षा शंकुतलाबाई बनसाेड,मुख्याधिकारी अशाेक कायंदे,कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे,शांतीलाल अग्रवाल, रईस मुजावर पठाण,विठ्ठलराव सपकाळ,राजरत्न निकम, कैसर आझाद,राजू गौर, शेख बाबर,सत्तार हुसैन,यांच्यासह नगरपालीकेचे अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती हाेती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें