महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2016 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये भोकरदन येथील कु.वैशाली तांगडे हिने या परीक्षेमध्ये यश संपादन केले. कठोर मेहनत, चिकाटी व अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे यश संपादन करत तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे. कु.वैशाली हिने चिकाटीद्वारे संपादन केलेले हे यश निश्चितपणे कौतुकास्पद आहे. तालुक्यातील युवक व युवतींसाठी तिचे हे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. भोकरदन येथील एस.डी.एम. कार्यालयातील अव्वल कारकून काशिनाथ तांगडे यांची ती मुलगी आहे. कु.वैशाली तांगडे हिच्या यशाबद्दल माजी नगराध्यक्षा श्रीमती आशाताई माळी, शर्मा ताई, सुरेश शर्मा, नगरसेवक दीपक बोर्डे,नगरसेवक अब्दुल कदिर यांनी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माझी मुलगी कु.वैशाली तांगडे हिचे पी.एस.अाय. पदी निवड झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेले कौतुक व सत्कार याबद्दल मी व समस्त तांगडे परीवार शतशः अाभारी अाहोत अशी प्रतिक्रिया कु.वैशाली हिचे वडील काशिनाथ तांगडे यांनी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें