नगराध्यक्ष या प्रभागात लक्ष देतील का ?
प्रतिनिधी.शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : शहरातील मुस्लिम बहुल भाग ज्याकडे पाहिले जाते ते म्हणजे रफिक कॉलनी या भागाकडे अनेक महिन्यापासून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे या भागातील तरुण वर्ग व नागरिकांचे मत आहे. गेल्या काही महिन्यापासून या भागातील लोक नागरी समस्या व स्वछतेसाठी नगरपालिकाकडे वारंवार मागणी करत आहे ,पण कुंभकर्णी झोपेत असलेली नगरपालिकांचा या कडे लक्ष द्याला वेळ नाही. 2016 मध्ये भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या वेळेस नगराध्यक्षा सौ मंजूषा देशमुख व त्यांचे पती माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधे बाबतीत व रस्ते व नाल्या आणि सिमेंट रोड बाबत मोठ-मोठे अश्वासन दिले होते अता दिड ते दोन वर्षे व्हायला झाली परंतु त्यांनी काही आपली आश्वासने पूर्ण केली नाही आणि अता सुद्धा करतील का नाही असे रफिक कॉलनीतील नागरिकांच म्हणणे आहे व ते आमच्या वॉर्डाकडे दुज भाव करत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे "स्वछतेच्या कार्यक्रमाला याच वॉर्डातून सुरुवात केली होती "व आज हेच वॉर्डात घाणीचे साम्राज्य म्हणून शहरात चर्चित आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरात गुरुवार पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली व नगरपालिकेचे सगळे पितळ उघडे पडले, पावसाच्या पाण्यामुळे नाल्यामधील घान आणि कचरा रोडवर पडला, मुख्यतः म्हणजे कॉलनीत मुख्य रोडवरच मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे या रोडवरून दिवस भर लोकांची येजा चालू असते वाहने येजा करतात, याच ठिकानाहुन गजानन मंदिर, फातेमा मशीद,अबुबकर मशीद, बरोबर न्यू हायस्कुल ,अल-फरहान ,ग्रिन वूड ,हज्जन खतीजा, या शाळेतील विद्यार्थी या घाणीतून येजा करतात ,या लहान मुलांच्या व या भागातील नागरिकांच्या या घाणीमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. तरी नगराध्यक्ष ,नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें