उपजिल्हा रुग्णालय ते निपाणी टाकळी ह्या रोड चे डांबरीकरण करण्याची मागणी.
अन्यथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांचे उपोषण.
सेलू ÷दि. 4 /6 /सोमवार रोजी मौजे निपाणी टाकळी, ग्रामीण रस्ता क्रं ५६ जो अर्धवट स्थितीत असलेला रस्ता पूर्ण स्वरूपात डांबरीकरण करून देण्यात यावा अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन देऊन करण्यात आली .
मौजे सेलू ते निपाणी टाकळी हा सेलू उपजिल्हा रूग्णालय येथुन जात असुन तो साधरंता तो ४ कि मी अंतराचा आहे सदरचा रस्ता हा पुढे जाऊन परभणी महामार्गाला निपाणी टाकळी पाटी परेंत जाउन मिळतो.
मागील काळात ह्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते. जे सेलू शहरातील वालूर नाका ते उपजिल्हा रुग्णालया परेंत हा अर्धवट स्थितीत केलेला असुण त्या मुळे रस्ता अर्धवट स्थितीत आहे. व पुढे केवळ या रस्त्यावर मुरूम गिट्टी व दगड टाकण्यात आलेआलेले आहे. ते जवळपास दोन वर्षा पुर्वीच करण्यात आले आहे. त्या वेळेस पासून अर्धा रस्ता कचा रस्ताच अस्तित्वात आहे.
या रोड च्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. तेथून बैल गाडी सुद्धा जाउ शकत नाही.
तरी जिल्हा परिषद, बांधकाम विभाग परभणी यांनी या रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण करण्यात यावे जेणेकरून हा रस्ता उपजिल्हा रुग्णालयापासुन ते निपाणी टाकळी या परभणी रोड परेंत असल्याने रुग्णवाहिका नेतांना किंवा हा रोड झाल्यास रुग्णवाहिका हि सेलू शहराला वेढा घालून परभणी रोड येईपर्यंत बराच मोठा वेळ वाचेल व एखाद्या पेशंट ला परभणी गाठण्यासाठी सोपे होईल.
या मागणीचे निवेदन माहितीस्तव बांधकाम विभाग सेलू. उपजिल्हा अधिकारी, आमदार विजय भांबळे, व बांधकाम सभापती आशोक नाना काकडे यांणा देण्यात आले आहेत,
हा रोड लवकरच सुरू करण्यात यावा अन्यथा
1 जुलै रोजी बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड व त्यांच्या सहकार्य मित्राणी दिला आहे.
या निवेदनावर सुनिल गायकवाड, कृष्णा काटे, विश्वास शेरे, दत्तूसिंह ठाकूर , रामप्रसादराव बोराडे,सतीश जाधव, रमेश दौड, राहुल नावाडे, प्रशांत नावाडे , विकास मगर, भगवान वाघ, सुरेश मगर, दगडोबा जोगदंड, अवधूत लिपणे वसंत शेरे, अभिजित राजुरकर, गणेश चव्हाण, कार्तिक चव्हाण, यांच्या सह्या आहेत,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें