अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी.
धडक देऊन वाहन पसार.
शे.सलिम.भोकरदन दि प्रतिनिधी- भोकरदन सिल्लोड रोडवरील इब्राहिमपुर फाट्याजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेने सुरेश मधुकर वेलदोडे वय 25 रा तांदुळवाडी हा समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनांच्या धडकेने जागीच ठार झाला तर नवनाथ रामदास गायकवाड वय 32.याच्या पायांना मार लागल्यामुळे भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यास औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले.
दरम्यान प्रथम दर्शनी अपघात झाला त्यावेळी मयत सुरेश व नवनाथ हे हिरो डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH 21.B.9980 वर आज दि 4.जुनला दुपारी 3.वाजेच्या दरम्यान इब्राहिमपुर फाट्यावरून आपल्या तांदुळवाडी गावाकडे मुख्य रस्त्यावर वळन घेत असताना समोरून येणाऱ्या अज्ञातवाहनांच्या धडकेनेत्यांना उडवून सदरील वाहन न थांबता पसार झाले असल्याचे समजते.
सुरज हा मुंबईत एका नामांकित कंपनीत कामाला होता.
मयताचे नातेवाईक मुंबई ला राहात असल्याने शवविच्छेदन ते ऐई पर्यन्त न करण्याचे इतर नातेवाईकांनी सांगितले. सदरील मयत सुरेश हा आपल्या आजोबा व आजी जवळ तांदुळवाडी येथे राहत होता. त्याचे आई वडील हे मुंबई ला राहतात. सदरील घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें