एमआयएम'ने शब्द पाळला, दंगलीत जळालेली 22 दुकाने पुन्हा उभारली.आ.ईम्तियाज़ जलील. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

एमआयएम'ने शब्द पाळला, दंगलीत जळालेली 22 दुकाने पुन्हा उभारली.आ.ईम्तियाज़ जलील.

एमआयएम'ने शब्द पाळला, दंगलीत जळालेली 22 दुकाने पुन्हा उभारली.आ.ईम्तियाज़ जलील.

औरंगाबाद : शहरात 11 मे रोजी शहागंज भागात उसळलेल्या दंगलीत जळून खाक झालेल्या सर्वधर्मीयांची दुकाने पुन्हा थाटून देण्याचा शब्द एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दंगलीनंतर या भागाची पाहणी करतांना दिला होता. वीस दिवसांतच त्यांनी तो शब्द पूर्ण केला. हिंदु, मुस्लिम, शीख अशा सर्वधर्मीय दंगलग्रस्त व्यापाऱ्यांची 22 दुकाने एमआयएमच्या प्रयत्नातून पुन्हा थाटण्यात आली. पवित्र रमजान महिन्यात हे काम करता आले याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केली.

यासंदर्भात जलील म्हणाले, "" दंगलीत शेकडो व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते, त्याची रोजी-रोटी हिरावली गेली. दंगलग्रस्त भागाला भेटी दिल्या तेव्हा प्रकर्षाने हे जाणवले. तेव्हाच ठरवले ज्यांना दंगलीचे राजकारण करायचे त्यांना करू द्या, आम्ही मात्र उध्दवस्त झालेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मदत करतांना जात-धर्म न पाहता माणुसकीच्या नजरेतून सर्वांना पाहू. आज महिनाभरातच आम्ही दंगलीमुळे रस्त्यावर आलेल्या व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने मालासह उभी करून दिली आहेत. आपला व्यवसाय नव्याने उभा राहत असल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्या सारखे वाटत आहे.

रमझानचा महिना आणि इफ्तार पार्टीचे औचित्य साधून हिंदु, मुस्लीम, शीख अशा सर्वधर्मीयांना एकत्र घेतले. एकमेकांना घास भरवत मनातील कटुता नाहीशी करण्याचा प्रयत्न केला. दंगली सोबतच आयुष्यातील अनेक स्वप्न जळून खाक झाली होती. त्या स्वप्नांना पुन्हा नवे पंख समाजाच्या मदतीने देता आले. दोन समाजात निर्माण झालेली तेढ कमी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, तो काही अंशी यशस्वी झाला असे म्हणावे लागेल असे जलील यांनी सांगितले.

दंगलग्रस्तांचे पुर्नवसन करण्यासाठी ज्या समाजातील दानशूर लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. सढळ हाताने मदत झाल्यामुळेच आम्ही केवळ दुकानांची उभारणीच नाही तर जळालेला माल देखील व्यापाऱ्यांना भरून देऊ शकलो. शहागंज भागातील 22 दुकाने नव्याने सुरू केल्यानंतर राजाबाजार भागातील आणखी चार व्यापाऱ्यांची दुकाने लवकरच उभारली जातील असा शब्द इम्तियाज जलील यांनी दिला.

आईस्क्रीम खायला येणार
दंगलीत शहागंज भागातील ईश्‍वर नावाच्या हिंदू व्यापाऱ्याचे दुकान भस्मसात झाले होते. मी जेव्हा पाहणी करायला गेलो तेव्हा तो आमचा हिंदू बांधव ढसाढसा रडला. त्यांच्या पाठीवर हात फिरवत " तुमचे दुकान पुन्हा उभारून देईन तेव्हा आईस्क्रीम खायला येईल असा दिलासा आणि शब्द मी त्यांना दिला होता. लवकरच त्यांच्या दुकानाचे काम पूर्ण होईल तेव्हा आईस्क्रीम खायला निश्‍चित जाणार असे देखील इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें