‘त्या’ महिलेच्या विरोधात गणेश नगरचे रहिवाशी पोलिस ठाण्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

‘त्या’ महिलेच्या विरोधात गणेश नगरचे रहिवाशी पोलिस ठाण्यात.

‘त्या’ महिलेच्या विरोधात गणेश नगरचे रहिवाशी पोलिस ठाण्यात.

महिलेसह दोन तरुणांना केले पोलिस ठाण्यात हजर ; एक जण पळाला.


प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू : शहरातील गणेश नगर या परिसरात खुलेआम वेश्या व्यवसाय करणार्‍या एका महिलेला त्रस्त झालेल्या रहिवाशांनी या महिलेसोबत घरात असलेल्या तीन तरुणांना बुधवार १३ जून रोजी सकाळी ८ वाजता पकडले. यावेळी मोठा जमाव जमला होता. जमाव, महिला व तरुणात बाचाबाचीही झाल्याने एकच गोंधळ उडाला.

याबाबतची माहिती पुढील प्रमाणे, मागील सुमारे दहा वर्षापासुन गणेश नगर मधील रहिवाशी या महिलेच्या कारणाम्याने त्रस्त झाले आहेत. पोलिस ठाण्यात अनेकदा रहिवाशांनी अर्जही केले. प्रत्यक्षात लोकांनी ठाण्यात जाऊन लेखी व तोंडी तक्रारीही दिल्या. परंतू या महिलेला पावबंद करण्यात आले नाही. उलट गणेश नगरचे रहिवाशी ठाण्यात तक्रार देऊनही पोलिस आपल्याला सहकार्य करतात या तोर्‍यात या महिलेच्या व्यवसायाला उधान आले. महिलेसह अन्य तरुणी आणि तरुणाच्या घोळक्याने या प्रतिष्ठीत गणेश नगरच्या शांततेला गालबोट लागु लागले. सदर महिला फोनवर ग्राहकांना बोलवायची आणि अनोळखी ग्राहक घर माहित नसल्याने या महिलेचे नाव घेऊन शेजारच्या महिलांना विचारणा करायचे. या प्रकाराने तर एकच गोंधळ उडायचा. असाच प्रकार बुधवार १३ जून रोजी घडला. आणि गणेश नगरमधील संतप्त नागरीक एकत्र आले आणि या गोंधळाला सुरुवात झाली. नंतर सर्वच जण ठाण्यात घडला प्रकार पाहण्यासाठी गेले. गणेश नगर येथील ग्रामस्थांची आक्रमकता पाहुन त्या महिलेसह दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. एक जण मात्र या गोंधळात पळुन जाण्यास यशस्वी झाला. सेलू पोलिसांनी या गंभीर प्रकरणी प्रल्हाद कान्हेकर या महिलेच्या घराशेजारी असलेल्या नागरिकाकडून फिर्याद लिहून घेतली आणि चौकशीसाठी ठेवली असे पोलिस ठाण्यातुन सांगण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या महिलेसह अन्य तिघांवर कोणती कारवाई केली हे मात्र समजु शकले नाही. परंतू पोलिसांनी महिला व तरुणांना हिसका दाखविताच महिलेने वेश्या व्यवसायाबद्दल कबुली दिली. तर या तरुणांनी महिलेनेच मोबाईलवरुन बोलाऊन घेतल्याचे पोलिसांना सांगीतले. हा प्रकार संतप्त नागरिकांसमोर घडल्यामुळे ते तक्रार दिल्यानंतर निघुन गेले.


गणेश नगरचे रहिवाशी त्या ग्राहकांना दाखविणार हिसका

घडल्या प्रकारानंतर गणेश नगरमधील रहिवाशी यांची भेट घेतली असता यापुढे रहिवाशांना त्रास झाल्यास या महिलेकडे येणार्‍या ग्राहकांना चांगलाच हिसका दाखविणार अशी प्रतिक्रीया संतप्त गणेश नगरच्या रहिवाशांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें