आदिवासीचे घरे तोडण्याऱ्यांनवर कायदेशीर कार्यवाही करावी....जाधव .
शिर्डी प्रतिनिधी/ बेकायदेशीर आदीवासीचे घरे तोडण्याऱ्यांनवर कायदेशीर कार्यवाही करावी असे एकलव्य आदिवाशी बहुजन पाटीचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी माघनी केली आहे असे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे शिर्डी ता राहाता येथिल भिल्ल समाज्राचे राहते घर व कुलदैवत लक्ष्मीमाता मंदिर भुसंपादन समितिने कोणत्याही कायद्यामध्ये न येता जाणुन बुजुन मोडतोड करून उध्वस्त केले आदिवाशी भिल्ल समाजाचा संसार उघड्यावर टाकला हि कार्यवाही बेकायदेशीर आसुन हा जाणुन बुजुन आदिवासी समाज्यावर केलेला आघात आहे बड्या लोकांच्या सांगण्यावरुन केलीली कार्यवाही आहे नियोजीत केलेला रस्ता हा त्वरीत बंद करुन आमची घरे पुर्वरत आहेत त्याच ठिकाणी बांधुन द्यावी प्रांतअधिकारी व भुसंपादन समितिवर कार्यवाही करावी गेल्या दोन दिवसांन पासुन पिडीत आदिवासी भिल्ल कुटूंबसह आमरण उपोषणास त्याच ठिकाणी बसले आसुन या मध्ये वयवृध.व दिर्घ आजाराने पिडीत आसलेल्याचा यात सामावेश आहे उपोषण कार्यकर्तेच्या सर्व जिवित हानिची जबाबदारी मा.प्रातअधिकारी व भुसंपादन समितिची आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बाबासाहेब तांबे.कैलास माळी.समिर शेख. अनिल बर्डे.अनिल भाऊसाहेब बर्डे.दिलिप बर्डे.आदींच्या सह्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें