नॅशनल इंटलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून सामान्य जनतेस न्याय...गोपाल शाॅ .
शिर्डी प्रतिनिधी/ सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा या स्वछ भावणेतुन नॅशनल इंटलिजन्स ब्युरो इंडिया या सामाजिक संस्थे मार्फत न्याय देण्याचे काम चालु असल्याचे नॅशनल इंटलिजन्स ब्युरोचे नॅशनल चिफ डायरेक्टर गोपाल शाॅ यांनी सांगितले शिर्डी येथिल के.बी.एस.ग्रॅंड या हाॅटेल मध्ये नुकतीच बैठक पार पडली या वेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले कि सर्व सामान्य जनतेला न्याय मिळत नाही कोर्टाचे कामे असतात पण पैसा नाही कायद्याची माहिती नाही या संस्था मार्फत मोफत सल्ला व मार्गदर्शन करुन त्या गोष्टींचा पाठ पुरोठा हि केला जातो नॅशनल इंटलिजन्स ब्युरोची मेन शाखा कलकत्ता येथे असुन महाराष्ट्रातही या संस्थे मार्फत काम सुरु आहे जवळ जवळ पंचविस मेंबर यात काम करत आहे पोलिसांकडुन गरीब जनतेला न्याय मिळत नाही असे बरेच उदाहरणे आहे मात्र पिडीत गरीब जनतेला आमच्या संस्थे मार्फत तक्रार जर पोलिस स्टेशनला नोंदवल्या त्या तक्रारीचा विचार त्या पोलिसांना करावाच लागतो व त्या प्रकारे माहिती पुरवली जाते
या सामाजिक संस्थेत न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांची गरज असुन या संस्थेत त्यांनाही सामाविष्ठ केले जाईल असे आव्हान राजेंद्र अभंग यांनी केले आहे या प्रसंगी नॅशनल इंटलिजन्स ब्युरोच्या पश्चिम बंगालच्या चिफ राखी पांडे.रविंद्र बनगय्या महाराष्ट्र चिफ.अॅड.बाळासाहेब कोते कायदेशीर सल्लागार.बाळासाहेब हिरगळ.सर्जेराव कोते.रामदास भोजणे. जितेंद्र यादव.सातव मेजर.शुभदा यादव.आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें