संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे प्रस्ताव १५ दिवसाच्या आत मंजूर करण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी दिला तहसीलदार यांना ईशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 जून 2018

संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे प्रस्ताव १५ दिवसाच्या आत मंजूर करण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी दिला तहसीलदार यांना ईशारा.

संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे प्रस्ताव १५ दिवसाच्या आत मंजूर करण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी दिला तहसीलदार यांना ईशारा.


जिंतूर – दि.०६/०६/२०१८ रोजी जिंतूर तहसीलदारांना संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे प्रस्ताव १५ दिवसाच्या आत मंजूर करण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी दिला तहसीलदार यांना ईशारा दिला आहे.
तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील  संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेतील वंचित आर्जदारांनी,  मी, ज्यावेळी मतदार संघाचा दौरा करत असताना आम्हाला कुठल्याच प्रकारचा आधार नाही, काम होत नाही, मुले मोठे असून देखील आम्हांला सांभाळत नाहीत, अश्या व्यथा माझ्या समोर मांडल्या. अनेक नागरिकांनी मला सागितले कि, आमचे प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल केल्या पासून आम्ही स्वतः परिस्थिती नसताना देखील १० ते १५ चकरा मारुनसुद्धा फाइल मंजूर होत नाहीत. त्यामधील तर काही अर्जदरांचा मृत्यू  सुध्दा झाला  आहे. अश्या गंभीर तक्रारी माझ्या समोर निदर्शनास आणून दिल्या आहेत.

काही माणसांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर गावी गेल्याचे सुद्धा सांगितले. यापूर्वी मी तहसीलदार यांना अनेक वेळा स्वतः कार्यालयात जाऊन तसेच फोनद्वारे सूचना केल्या होत्या. परंतु, तहसीलकार्यालय कडून व कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांची याविषयी कमालीची उदासीनता दिसून येत आहे. शासनाच्या  परिपत्रकानुसार वर्षभरात ज्या-ज्या तारखेला महापुरुषांच्या जयंती असतात त्या-त्या तारखेला आपण बैठक घेणे अनिवार्य होते. परंतु, अश्या प्रकारच्या बैठका घेतल्याचे माझ्या निदर्शनास आलेले नाही.

तरी या सर्व आर्जदारांच्या पगारीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी येत्या १५ दिवसांच्या आत तहसील कार्यालयात दाखल असलेल्या तसेच मागील बैठकांमध्ये त्रुटीमध्ये वगळण्यात आलेले प्रस्ताव, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेले प्रस्ताव त्रुटीची पूर्तता करून तसेच ज्या नागरिकांचे राहिलेले प्रस्ताव मागवून घेऊन तात्काळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात यावेत.असा इशारा दिला. अन्यथा  १५ दिवसांच्या आत जिंतूर तालुक्यातील आर्जदारांचे प्रस्ताव मंजूर न झाल्यास या आर्जदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सेलू तर्फे तहसील कार्यालयात बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात स्पष्ट सांगितले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें