देश सेवेच्या कार्य पेक्षा कुठलेही महान कार्य नाही....मेजर जगताप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 जून 2018

देश सेवेच्या कार्य पेक्षा कुठलेही महान कार्य नाही....मेजर जगताप.

देश सेवेच्या कार्य पेक्षा कुठलेही महान कार्य नाही....मेजर जगताप.

कु.किरण जाधव.
शिर्डी प्रतिनिधी/ निमंगाव येथील मेजर राजेंद्र जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात. व लिझिम पथकासह भव्य आशी मिरवणूक ग्रामस्थांच्यावतीने काढण्यात आली या बाबद माहिती अशी कि मागील महिन्यात पाकिस्तान सैन्याकडुन भारत सिमेवर होणारे अतिरेकी हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहे याच हल्ल्यात प्रतिउत्तर देतांना निमंगावचे सपुत्र मेजर राजेंद्र जगताप हे जख्मी झाले होते आज ते आपल्या गावाकडे आल्या मुळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा आई व सपत्नीक मोठ्या प्रमाणात सत्कार ठेवण्यात आला  होता या वेळी सभापती सौ कातोरे.भाऊसाहेब कातोरे. सोपानराव जगताप.उपसरपंच अजय जगताप.भानुदास कातोरे. शरद मते.ग्रामसेवक डबे.सिकंदर शेख.शिमोन जगताप.कैलास कातोरे.भाउसाहेब जगताप.लुकास जगताप.बाळासाहेब गाडेकर.मनोज वदक.बि.के जगताप.आदी ग्रामस्थांनी मेजर जगताप यांचा सत्कार केला या वेळी "भारत माता कि जय" या घोषाणे निमंगाव परीसर दनानला होता. आपले मनोगत व्यक्त करताना जगताप म्हणाले कि मी रणांगणावर घायाळ होऊन पडलो मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शप्पथ जागी झाली होती.डाॅ बाबासाहेब आंबेडकर. व वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सैन्यामध्ये भरती झालो होतो आणि आज लढताना शत्रुच्या एका बाॅम  गोळ्याने माझा वेध घेतला होतो जखमी होऊन मी खाली कोसळलो पण तातपुर्वी मी त्यांचे बंकर उध्वस्त केले  शत्रुच्या सैनीकांना यमसदनी धाडले समोरुन फेकलेला बाॅम माझ्या  जवळ येऊन पडला क्षणभर जर येथेच थांबत असतो तर मी व माझे सहकारी या बाॅम गोळ्याच्या  हल्ल्यातून बचावले नसते रमजान चा पवित्र महिना असतांना सिमेवर भारत सरकारने शस्त्र बंदी केली होती पण पाकिस्तान ने याचे उल्घन करुन रोज अतिरेकी हल्ला व बम मारी सुरूच ठेवले याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सैनिक रात्रंदिवस प्रतिउत्तर देण्यासाठी सक्षम आहे पाकिस्तानवर कुठलाही विश्वास ठेऊ नये पाकिस्तानला धडा शिकवण्याची आत्ता वेळ आली आहे तरुण पिढीने मोठ्या संख्येने देश सेवा साठी सैन्यात दाखल व्हावे देशसेवेचे कार्य महान असुन या पेक्षा कुठलेही महान कार्य नाही आपण आज जो श्वास घेतो उत्सव सण साजरा करतो एक मेकानच्या सुखा दुःखत भाग घेतो अनंदाने स्वतंत्र पणे जगतो कुटूंबा सोबत राहातो हे केवळ भारताच्या सिमेवर लढणाऱ्या जवानांना मुळे सिमा सुरक्षीत असल्याने आपण जगत आहोत मात्र याच सिमेवर लढणाऱ्या जवानांना साठी भारत सरकारने आत्य आधुनिक यंत्र सामृग्री पुरवावी मात्रुभुमीची सेवा करण्याचा जो अनंद आहे तो कोणत्याही गोष्टीत नाही परमेश्वराच्या आशिर्वादाने व ग्रामस्थांच्या वतीने मिळालेल्या स्फुर्तीने व आई.पत्नी मुले यांच्या मायेने या हल्ल्यातून बचावलो लवकर बरा होऊन पून्हा भारत मातेच्या सेवेसाठी सिमेवर जाऊन पाकिस्तान सैन्याला चोख उत्तर देण्यासाठी माझी व माझे सहकारी तयार आहे असे ते शेवटी म्हणाले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें