काँग्रेसचे अच्छे दिन सुरु.! युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवून संधीचे सोने करुन घ्यावे - आ.अब्दुल सत्तार ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

काँग्रेसचे अच्छे दिन सुरु.! युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवून संधीचे सोने करुन घ्यावे - आ.अब्दुल सत्तार ;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 22
भाजपचा आतापासूनच पडझडीचा काळ सुरू झाला असुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवतरुणांची राजकीय फळी खुपच जोमाने कामाला लागली असुन काँग्रेस पक्षाचे अच्छे दिन सुरू झाले असुन वाडी - वस्ती - तांड्यांसह शहरातील नवयुवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवून संधीचे सोने करुन घ्यायला हवेत यापुढे राजकारणात नवयुवकांना अधिकची संधी राहणार असल्याचे मतही माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील उपळी,बोरगावबाजार,खातखेडा, लोणवाडी,अंधारी,टाकळी,म्हसला, बोरगाव सारवणी, सावखेडा आदि गावांतील शेतकरी - शेतमजुर - नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन पिकविमा - बोंडअळीं नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या मदतनिधीसंदर्भात चर्चा केली असता शेतक-यांमधून सरकारविरोधात नाराजगी व्यक्त करण्यात आली.
अंधारी परिसरातील दमदार पावसाच्या हजेरीने या परिसरातील शेतक-यांनी पेरणीस सुरुवात केली असुन आ.अब्दुल सत्तार यांनी सदरील शेतक-यांच्या भेटी- गाठी घेऊन खते बि बियाण्यांसंदर्भातही अडी अडचणी जाणून घेतल्या. पिकविमा - बोंडअळींच्या नुकसान भरपाईपोटी सरकार तोकडी मदत देऊन शेतक-यांची एकप्रकारे थट्टाच करीत असून सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याचे मत व्यक्त करीत येत्या पावसाळी अधिवेशनात मदतनिधीसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत अधिवेशन चालूच देणार नाही असे मतही आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणी मोहिमेसंदर्भातही गावा गावातील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते नागरिकांसह नवतरूणांशी चर्चा करीत बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशील नोंदणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवून संधीचे सोने करुन घ्यावे. राजकारणात मतदारांच्या आशा नवतरुणांवर पल्लवीत होत आहेत. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या गावा - गावातील सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून समाजकारणात आपला ठसा उमटवावा , गाव - वाडी - वस्त्यांसह शहरातील युवकांनी संघटन वाढवून युवकांची फळी मजबूत करावी असे आवाहनही माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी गावा- गावातील नागरिकांच्या भेटीगाठी दरम्यान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, नरसिंगराव चव्हाण,दामुआण्णा गव्हाणे,अजिज बागवान,राजू सुरडकर,धनजी पाटील गोंगे,अब्दुल रहीम,आण्णा पांडव,बालू भाऊ गोरे,पुंडलिक गोंगे,सुरेश गोंगे,जितू तांबे,आदींसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें