मानवत येथील मुख्यंरस्त्यावर धाडसी चोरी! चंपावती ईलेकट्रिकल दुकाणातुन ९५००० रुपयाचा माल लंपास. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

मानवत येथील मुख्यंरस्त्यावर धाडसी चोरी! चंपावती ईलेकट्रिकल दुकाणातुन ९५००० रुपयाचा माल लंपास.


मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत शहरातील  मेनरोडावरील अत्यंत मुख्यरस्त्यावर असलेल्या चंपावती ट्रेर्डस वायडिग  दुकानातुन दि.२१ जुन राञीच्या सुमारास शटरचे दोन्ही कुलुप तोडुन चोरानी चोरी केल्याची घटना  घडली असुन यात चोरट्यानी दुकानातील साहित्य व नगदी असे मिळुन  ९५००० रुपयाचा माल लंपास केला आहे या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
या विषयी मानवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादि राजकुमार बस्तीराम मंञी यांनी दिलेल्या फिर्यादि त नमुद केले आहे की,मानवत येथील ईडिया बँकेचे समोर नगरपरिषद च्या शॉपिग सेटर येथील दुकानातुन वायडिग वायर १० रिल किंमत ४५००० रुपये ,समबिंग वायर १५ बंडल ४०००० रुपये ,७ नग पंखे किंमत ७००० रुपये व लाकडि गल्ला त्यात दुकाणाचे लायसन्स कागदपञे ,बिलफाईल खातेवही व नगदी ३००० रुपये असा एकूण ९५००० रुपयाचा माल दि.२१ जुन राञी ८-३० ते २२ जुन सकाळी ६ च्या सुमारास चोरी झाला आहे . फिर्यादिने आपली दुकान चंपावती ट्रेर्डस वायडिग दुकान घरी बंद करुन गेले आसता त्याचे भाऊ सकाळी दुकान उघडण्यासाठी आले आसता अज्ञात चोरट्यानी दुकाणाचे दोन्ही शटर चे कुलुप तोडुन शटर अर्धवट करुन दुकाणात प्रवेश करुन दुकानातील साहित्य व नगदी असे ९५००० रुपयाचा माल लंपास केला या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गु.र.नं.११२/२०१८ कलम ४५७,३८० भा.द.वि.नुसार गुन्हयाची नोद करण्यात आली असुन तपास हेडकॉन्सटेबल आर.एस.कनके हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मिना कर्डक यांनी घटनास्थळी भेट  देऊन घटनेची पाहणी केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें