मंठा तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा संदीप वाघ झाला पी. एस.आय.(पोलीस उपनिरीक्षक) झाला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

मंठा तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा संदीप वाघ झाला पी. एस.आय.(पोलीस उपनिरीक्षक) झाला.

मंठा तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा   संदीप वाघ झाला पी. एस.आय.(पोलीस उपनिरीक्षक)  झाला.

मंठा/ हाफेज शबाब बागवान

     मंठा तालुक्यातील (हेलस) वाडी येथील संदीप  सीताराम वाघ  झाला पी.एस.आय.
         वाडी ( हेलस ) तालुका मंठा,जि.जालना येथील शेतकरी सीताराम वाघ यांचा मुलगा
संदीप वाघ याने ध्येयाचे शिखर गाठायचे असे ठरवून टाकले होते. औरंगाबाद  सारख्या स्पर्धेच्या शहरात राहून पप्रतिकूल  परिस्थितीच सामना  करत मनातील  जिद्द  पूर्ण करण्यासाठी खूप  मेहनत घेतली.
        आपले आई वडिल रात्रंदिवस  शेतात राबराब राबतात तरीही  शेतीतून  लावलेला खर्च सुध्दा निघत नाही. आई वडिलाचे कष्ट पाहून संदीपने  मनात ठरवले  की , जोपर्यंत आपण कुणीतरी मोठे अधिकारी बनल्याशिवाय गावी यायचेच नाही. आणि ही जिद्द त्याने सतत दोन वर्ष  रात्रंदिवस अभ्यास करून पूर्ण  केली आहे.
                पोलिस उपनिरीक्षकाची पात्रता  पूर्ण  करूनच गावी परतलेल्या संदीपचे मंठा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें