मुले पळविणाच्या टोळीच्या अफवे बाबत नागरीकांना आवाहन.
सेलु प्रतिनिधिमागील काही दिवसापासुन सर्वत्र लहान मुले पळविण्याच्या टोळ्या फिरत असल्या बाबतची
माहीती दररोज सोशल मिडीयाद्वारे व्हायरल होत आहे. त्यामुळे समाजात घबराट निर्माण झालेली आहे.
त्या अनुषंगाने सेलु उपविभागातील पोलीस दलाच्या वतीने सेलु तालुका, पाथरी तालुका
तसेच मानवत तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी अशा अफवांवर
विश्वास ठेवु नये. मुले पळविणार्या टोळी बाबत वरील तालुक्यामध्ये किंवा ग्रामीण भागात कुठल्याही
प्रकारची घटना घडलेली नाही.
तरी अशी कोणतीही बातमी कानावर आल्यास त्या बाबत शहानिशा करुन संशयीत व्यक्ती
आढळून आल्यास कायदा हातात न घेता अशा व्यक्तीस त्वरीत जवळील पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन
पोलीसांचे हवाली करावे. सेलुपाथरी व मानवत तालुक्याच्या सर्व पोलीस स्टेशन मार्फतीने अशा फिरस्ती
लोंकाची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे केवळ व्हायरल होत असलेल्या अफवांबर नागरीकांनी
विश्वास ठेवु नये असे अवाहन पोलीस दलाकडून करण्यात येत आहे
संपर्कासाठी महत्वाचे दुरध्वनी क्रमांक.
१) पोलीस नियंत्रण कक्ष परभणी ०२४५२ २२६२४४
२) पोलीस स्टेशन सेलू ०२४५१-२२१३३
३) पोलीस स्टेशन मानवत ०२४५१-२४०१००
४) पोलीस स्टेशन पाथरी ०२४५१-२५५३३३

सत्य आहे
जवाब देंहटाएं