करमाड येथे रमजान ईद शांततेत साजरी.
करमाड येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली करमाड येथील ईदगहात सामूहिक नमाज अदा करण्यात आली.हाफिज जब्बार साहब यांनी ईद ची नमाज पडवून सम्पूर्ण जगात शांतता नांदावी व लोकांन मध्ये बंधुभाव प्रेम निर्माण व्हावा या साठी दुवा केली तर मौलाना अमीन सहाब यांनी ईद चा खुदबा दिला.
या प्रसंगी ईदगहा मध्ये प स सभापती कैलास उकर्डे,करमाड ग्रामपंचायत चे सरपंच तुकाराम तारो,व सर्व सदस्य यांनी ईद च्या शुभेच्छा दिल्या तर करमाड पोलीस स्टेशन च्या वतीने गुलाबपुष्प देऊन सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी पो.नी. कोळी साहेब,भालेराव साहेब व सर्व पो.कर्मचारी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें