कन्नड-सावरगांव येथे रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

कन्नड-सावरगांव येथे रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली।

कन्नड-सावरगांव येथे रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड  (दि १६) कन्नड  तालुक्यातील सावरगांव  येथे रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आली सकाळी  ९:३० वाजता सामुदायिक नमाज  पठण करण्यात आली  सकाळी सर्व मुस्लिम समाज बांधवानी  ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या व गळाभेट  घेतली।

मुंबईसह देशभरात रमजान ईदचा उत्साह  पाहायला मिळत आहे  कन्नड तालुक्यातील  सावरगांवच्या नुराणी  मशिदीतही नमाज पठणासाठी मुस्लिम  बांधवांनी गर्दी केली  रमजान ईदची सुरुवात  ईदच्या नमाजाने होते  सर्व मुस्लीम पुरुष नवे  कपडे परिधान करुन  ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत  जातात नमाजानंतर  लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात।

आज ईद उल फित्र  अर्थात रमजान ईद  भारतात शनिवारी ईद  साजरी केली जाईल अशी घोषणा दिल्लीतील  जामा मशिदीचे शाही  इमाम,इमाम बुखारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली शुक्रवारी रात्री ७.३५ च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्याचं इमाम बुखारी  यांनी सांगितलं।

ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच बाजारात लोकांची गर्दी वाढली।

राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात ते म्हणाले की, "ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व मुस्लीम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. रोजानंतर पवित्र रमजान महिन्याचा उत्सहाने समारोप होत आहे. समाजात बंधुभाव आणि सामंज्यस वाढो, अशी प्रार्थना करतो।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें