परभणी येथून जिंतुर परती साठी प्रवासियांचे हाल कायम.बसस्थानक प्रमुख यांची बघ्याची भूमिका? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

परभणी येथून जिंतुर परती साठी प्रवासियांचे हाल कायम.बसस्थानक प्रमुख यांची बघ्याची भूमिका?

परभणी येथून जिंतुर परती साठी प्रवासियांचे हाल कायम.बसस्थानक प्रमुख यांची बघ्याची भूमिका?


जिंतुर / निशाद आहेमद.

दर रोज रात्रि परभणी येथून जिंतुर ला परत येण्यासाठी दोन दोन तास बस उपलब्ध नसलेल्या परिस्थितिवर कुठलाच तोड़गा न काढण्याचा चंगच बसस्थानक प्रमुख विश्वनाथ चिभड़े यांनी बांधलाय अशी परिस्थिति आहे
वास्तविक जिंतुर बसस्थानकावर नियमित पणे बस व्यवस्थापनाच काम पहानारे चिभड़े हे स्वतः जिंतुर मुख्यालय ठिकाणी न राहता परभणी येथे दररोज अपडाउन करतात
रोज जाने येणे करत असतानाही त्यांना प्रवस्या चे हाल दिसत नाहीत का?असा प्रश्न जिंतुर येथील त्रस्त झालेले प्रवासी विचारत आहेत
परभणी येथून रात्रि जिंतुर कड़े परतिचा प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत रात्रि आठ नंतर ठरलेल्या वेळे प्रमाणे कोणतीही फेरी जात येत नाही
लातूर जिंतुर बस पण रसत्याचे काम चालू असल्याने निर्धारित वेळेत पोहचत नसल्याने  प्रवासी ग्राहक त्रस्त होताना दिसतात
दोन दोन तास बस नाही या मुळे खोळबुन राहिलेले प्रवासी बसची वाट पहात असताना एखादी बस येते त्या बस मध्ये शेकडो प्रवासी बसन्या साठी धावपळ करतात या वेळी अनेक प्रवासियांचे आपसात भांडन होतात,अनेक वेळा महिला जेष्ठ नागरिक मुले बस मध्ये चढने करीता घाई गड़बड़ करतात आशा वेळी अनेक प्रवासयांचे खुप हाल होत आहेत  तर बस भरगच भरल्या नंतरही चालक वाहक दूसरी बस आल्या शिवाय बस काढत नाहीत उदा दि 19 जून रोजी रात्रि लातूर जिंतुर बस क्र9676 ही बस परभणित रात्रि 10 ला पोहचलि पण दूसरी बस 10:30  आल्या नंतर च बस मार्गस्थ झाली
हे कसे कळत नाही यांची कमाल आहे परभणी व जिंतुर बसस्थानकात सिसिटिव्ही आहे त्यावरील परिस्थिति पहाणी करुंन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे
बसस्थानक प्रमुख बघ्याची भूमिका किती दिवस घेणार आणि प्रवासी यांचे हाल कधी  सम्पनार हा अनुउतरीत प्रश्न आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें