उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात.

उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. निकम पुण्याहून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. सुदैवाने निकम सुखरुप असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. खालापूर जवळ झालेल्या या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली फुड माॅलसमोर विशेष सरकारी वकिल अॅड उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पोलीस अधिकारी पोेंक्षे यांच्यासह अन्य एकजणजखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उज्ज्वल निकम यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना त्याच्या ताफ्यातील गाडीला (MH  01 BG 0348) अपघात झाला. यामध्ये पोलीस अधिकारी पोेंक्षे व अन्य एक जण जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें