विस्कळीत वीजपुरवठ्याने मोसंबीची बाग जळाली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

विस्कळीत वीजपुरवठ्याने मोसंबीची बाग जळाली.

विस्कळीत वीजपुरवठ्याने मोसंबीची बाग जळाली.

सेलू प्रतिनिधी.
सेलू वीज वितरण कंपनीने सुरळीत विज ठेवला नाही तसेच अडीच महिन्यापासून जळालेले रोहित्र दुरुस्त न केल्याने मोसंबीची बाग जळाली आहे याचा पंचनामा करून नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी शारदा काकडे यांनी निवेदनाद्वारे सेलू तहसीलदार यांच्याकडे केली आहे तालुक्यातील रायपुर येथे शहादा काकडे यांची गट नंबर 278 मध्ये 1 हेक्टर 26 आर शेती आहे त्यामध्ये 140 मोसंबीच्या झाडाची लागवड करण्यात आली होती मोसंबीला पाणी देण्यासाठी कधीही सारख्या दाबाने वीजपुरवठा झाला नाही त्यामुळे वर्षातून दोन ते चार वेळा मोटारी जळतात मोसंबीच्या उत्पन्नातून कर्ज परत फेड करण्याचा काकडे यांचा विचार होता त्यातच अडीच महिन्यापूर्वी गायरानातील रोहित्र जाळल्याने वीज पुरवठा खंडित झाला याविषयी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे 13 वर्षांपासून सांभाळलेली मोसंबीची बाग जळाली आहे याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शारदा काकडे यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें