एसटी कर्मचार्यांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी प्रवाशांना फटका.
सेलू बस्तान वरील पाथरी आगाराच्या 72 फेऱ्या रद्द.
सेलू प्रतिनिधीसेलू आपल्या पगार वाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक विस्कळीत झाली असून सुमारे 136 फेऱ्या रद्द झाल्याने शनिवारी आठवडी बाजाराच्या दिवशी प्रवाशांच्या मोठी गैरसोय झाली आहे शनिवार 9 जून रोजी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी एकूण 152 फेऱ्या पैकी केवळ 16 फेऱ्या पूर्ववत झाल्याने 136 फेऱ्या रद्द साल्याची माहिती सेलू बसस्थानकाचे प्रभारी वाहतूक नियंत्रक इथे यांनी दिली शनिवारी परभणी आगाराच्या 12 परतुर आगाराच्या 3 व मेहकर आगाराची 1 आशा केवळ 16 फेऱ्या झाल्या येथील बस स्थानवर पाथरी आगाराच्या 72 फेऱ्या नियमित होतात त्या सर्वच रद्द झाल्याने ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊन शनिवार आठवडी बाजाराला येणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे पाथ्री आगाराच्या फेऱ्या वर सेलू वालुर सेलू परतुर सेलू मंठा सेलू जिंतूर सह ग्रामीण भागात जाणारी एकही बस नेहमीच्या रस्त्यावरून धावली नाही यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा घरा परिणाम दुसऱ्या दिवशी चांगला जाणवायला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें