२१ जून सेलू येथील अर्जुन नगरमध्ये
असलेल्या जगदंबा जलधारा
प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी या
प्रकल्पात असलेल्या पाण्याच्या तीन
मोटारी, छोटाहत्ती, ऑटोच्या
बॅटरीची चोरी केली. ही चोरी
करण्यात आल्यानंतर या प्रकल्पाचे
पाणी पुरवठा करणारे अंतर्गत पाईप
व अन्य साहित्याची नासधूस
केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री
२.३० च्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती या प्रमाणे,
तहसिल रोडच्या रस्त्यावर
असलेल्या अर्जुन नगरमधील मंचक
प्रकाशराव जोगदंड यांच्या
मालकीच्या पाण्याच्या जारच्या
जगदंबा जलधारा प्रकल्पामधील पाण्याच्या तीन मोटारी ज्याची
किंमत १८ हजार रुपये, छोटाहत्ती
अँटोची एक्साईड कंपनीची रुपये ६
किंमत असलेली बॅटरीची चोरी
करण्यात आली. चोरट्यांनी चोरी
केल्यानंतर प्रकल्पामध्ये असलेल्या
पाईपलाईन तसेच इतर साहित्याची
मोठी नासधूस केली. हा प्रकार
बुधवारी रात्री २.३० च्या सुमारास
घडला. घटनास्थळी वाचमन नितीन
उफाडे राहतात. परंतू हा प्रकल्प
पत्राच्या शेडचा असल्याने वादळी।
वायासह पाऊस यासह पडत
असल्यामुळे वाचमन उफाडे या
प्रकल्पाच्या जवळ असलेल्या
आपल्या घरी सुरक्षीततेमुळे गेले
असता चोरट्यांनी हा प्रकार केला.
या चोरी प्रकरणी अद्यापही तक्रार
दाखल करण्यात आली नाही.
जगदंबा जलधारा या प्रकल्पाची
नासधूस व साहित्याच्या चोरीमुळे
दुसर्या दिवशी पाणी वाटपात
ग्राहकांची गैरसोय झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें