शिर्डी - सिकंद्राबाद रेल्वेतील महिलेचे दागिने चोरणार्‍यास अटक.दोन मोबाईल, मंगळसुत्रासह ८५ हजाराचा ऐवज जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 जून 2018

शिर्डी - सिकंद्राबाद रेल्वेतील महिलेचे दागिने चोरणार्‍यास अटक.दोन मोबाईल, मंगळसुत्रासह ८५ हजाराचा ऐवज जप्त.


सेलू,प्रतिनिधी
शिर्डी - सिकंद्राबाद रेल्वेने प्रवास करणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्राची चोरी १६ जून रोजी रात्री ११.१० वाजेच्या दरम्यान करण्यात आली होती. या घटनेत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात तरुणाच्या विरोधात औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात १६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच घटनेचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोड यांनी सेलू  येथून काही संशयीत आरोपींना ताब्यात घेतले होते. यापैकी दोन आरोपींना पोलिसी  हिसका दाखविताच त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.


याबाबतची माहिती या प्रमाणे, शिर्डी - सिकंद्राबाद या शिर्डीहून सिकंद्राबादकडे जाणार्‍या गाडी क्रं. १७००१ या रेल्वेने प्रवास करणार्‍या आनंतलक्ष्मी इडकुल्ला या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र सेलू  रेल्वे


 स्टेशनवर गाडी  सुरु होताच आरोपींनी हिसकावले होते. सदर घटनेत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीची चौकशी जालना रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोड २१ जून रोजी रात्री १० वाजता उमेश अर्जुन तोडे (वय ३० वर्षे), संतोष नारायण केवारे (वय १७ वर्षे, दोघेही  राहणार सेलू यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र तसेच ५० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा ८६ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी उमेश तोडे यास शुक्रवार २२ जून रोजी रेल्वे कोर्टात हजर केले असता त्यास २५ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पो.नि. दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोड हे करीत असून त्यांना पोलिस उपनिरीक्षक बेग हे सहकार्य करीत आहेत.
तिसर्‍या आरोपीस रेल्वे पोलिसांकडून अभय आनंत लक्ष्मी इडकुल्ला या महिलेच्या दागिन्याच्या चोरी प्रकरणी सेलू मधुन पोलिसांनी नेमके किती आरोपी ताब्यात घेतले याची अधिकृत माहिती पेक्षा अभय देण्यात आलेल्या तिसर्‍या आरोपीची चर्चा सेलू येथे होत असतांना पोलिसांनी मात्र याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करून  प्रकरण गुलदस्त्यात ठेऊन दोनच आरोपी जाहीर केले आहे.  पोलिस या प्रकरणातील तिसर्‍या आरोपीला अभय देत आहेत अशी चर्चा शहरात होत असून नेमके किती आरोपी होते हे फिर्यादी महिलाचे जबानी नंतरच समजू शकेल. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें