सिल्लोड/शेख कलीम.दि.23/06/18.
औरंगाबाद जिल्हा परिषद तर्फे सिल्लोड तालुक्यात उर्दू प्राथमिक शाळा चालू असून त्यात 49 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या तात्काळ भरण्यात यावे नसता तिव्र अंदोलन करण्यात येईल. असा इशारा कैसर आझाद , नगरसेवक तथा अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात कैसर आझाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय वाईट पणे अल्पसंख्याका च्या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा कडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून मुस्लीम समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क पासून वंचित करण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करीत नाही म्हणून आम्ही जन अंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. सिल्लोड तालुक्यात
अंजिठा,गोळेगाव,अंभाई,नानेगाव उडंणगाव,पांगरी,जंभाई,आमठाना,चारणेर , घाटनारदा,अशा अनेक मुस्लीम बहूल अल्पसंखयाक गावात जिल्हा परिषद औरंगाबाद च्या उर्दू प्राथमिक शाळा चालू असून विद्यार्थीना शिकण्यासाठी नेहमी उत्सुक आहे हे लक्षात घ्यायला हवे परंतु या ठिकाणी उर्दू शिक्षकांच्या 49 रिक्त पदे असल्याने मुस्लीम विद्यार्थीची गैर सोय आहे. अशा प्रकारे एका निवेदनात म्हटले आहे संबंधित मा.शालेय शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे जी,ग्राम विकास मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे जी ,मा.श्री सूनिल चव्हाण जी संचालक प्राथमिक शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे,मा.शिक्षण उप संचालक जी औरंगाबाद, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जी जिल्हा परिषद औरंगाबाद आणि मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कडे उर्दू शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें