सेलू उपविभागातंर्गत तलाठी कर्मचार्यांच्या बदल्या.
प्रतिनिधी.सेलु.
सेलू : उपविभागीय कार्यालयातंर्गत सेलू, जिंतूर तालुक्यात कार्यरत तलाठी संवर्ग कर्मचार्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. जवळपास १८ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांना पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिल आहेत.
बदली झालेल्या तलाठी कर्मचार्यांच्यामध्ये वालूर सज्जाचे एस.बी. रोडगे यांची जिंतूर तालुक्यात कौठा, रायपूरचे सी.व्ही. वाघ यांची वालूर, जिंतूर तालुक्यातील वस्सा सज्जाचे आर.जी. स्वामी यांची सेलू तालुक्यात झोडगाव, ढेंगळी पिंपळगावच्या श्रीमती सारिका हेडगे यांची जिंतूर तालुक्यात वस्सा, गडदगव्हाणचे जी.आर. हनवते यांची जिंतूर, जिंतूरचे एस.पी. पौळ यांची गडदगव्हाण, देऊळगाव गातचे एम.ए. रणनवरे यांची कुपटा, हादगाव खु.चे एम.आर. कुरेवाड यांची वाई, जिंतूर तालुक्यातील अकोली येथील जे.एन. प्रधान यांची सेलू तालुक्यात मोरेगाव, जिंतूर तालुक्यातील मालेगावचे एस.जी. शहारे सेलू तालुक्यात गव्हा, सेलूच्या श्रीमती रजियाबेगम गुलाम मुर्तजा यांची जिंतूर तालुक्यात मालेगाव, खवणे पिंप्रीचे बी.एल. ढवळे यांची राजवाडी, मोरेगावचे एच.एस. बोरकर यांची खवणे पिंप्री, मोरेगावचे बी.डी. भोसले यांची देऊळगाव गात, म. जियाऊर रहेमान यांची जिंतूर तालुक्यात वाघी बोबडे, व्ही.बी. आगलावे यांची हादगाव खु, श्रीमती ए.एस. आतकरे यांची जवळा जीवाजी, म. युनूस म. कसीम यांची ढेंगळी पिंपळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें