देवगावफाटा येथे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा.
पाच जणांविरोधात गुन्हा; रोख रक्कमेसह जुगार साहित्य जप्त.
प्रतिनिधी.सेलु.सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर ६ जून रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास चारठाणा पोलिसांनी धाड टाकुन पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील रोख १ हजार २०० रुपये व जुगार साहित्य जप्त करुन त्यांच्या विरुध्द मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई केली.
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे झन्नामन्ना जुगारासह अवैध देशी दारुचा व्यवसाय खुलेआम चालु असून या बाबत नागरिकांनी निवेदनही दिलेली होती. तरी सुध्दा कोणतीही कार्यवाही होत नव्हती. परंतू चारठाणा पोलिस स्टेशनचे सपोनि. अजयकुमार पांडे, जमादार गुलाब भिसे, झाडे, भानुसे, जानकर या पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता देवगावफाटा येथे मातोश्री हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यामध्ये पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख १२०० रुपये व जुगार साहित्य जप्त केले. आरोपींविरुध्द मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करुन जामिनावर आरोपींना सोडून देण्यात आले. परिसरातील जनतेसह जालना जिल्ह्यातील काही मंडळी सुध्दा या जुगार अड्ड्यावर हजेरी लावतात. परिसरातील शेतकरी बी - बियाणे खरेदीसाठी घरुन आणलेले पैसे या जुगार अड्ड्यावर घालत आहेत. अशा परिस्थिती हा जुगार अड्डा व अवैध देशी दारु विक्री बंद होणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी जुगार अड्ड्यावर व अवैध देशी दारु विक्री चालकाविरुध्द ठोस कारवाई करतात की नाही याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें