मंठा तालुक्यातील पाटोडा बु.येथे जन्मदात्यानेच केला मुलाचा खुन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

मंठा तालुक्यातील पाटोडा बु.येथे जन्मदात्यानेच केला मुलाचा खुन.

मंठा तालुक्यातील पाटोडा बु.येथे जन्मदात्यानेच केला मुलाचा खुन.


प्रतिनिधी.हाफेज़ शबाब बागवान.
पोलीस उपविभागीय  : मंठा तालुक्यातील पाटोदा बु.येथील बाबासाहेब वामनराव घोंगडे याने स्वतःचा मुलगा रामेश्वर घोंगडे यास कुर्हाडीने घाव करून ठार मारल्याची घटना [ता.२०] बुधवार रोजी घडली.


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा येथील रामेश्वर बाबासाहेब घोंगडे याने दारूच्या नशेत आपल्या वडीलाशी बाचाबाची केली. मला माझी वाटणी द्या अशी मागणी करुन दारूच्या नशेत कुर्हाड घेऊन वडीलावर चाल केली.परंतू वडिलांनीच मुलाच्या हातातील कुर्हाड घेऊन मुलाचे जीवन संपवले.दारूच्या नशेत शुल्लक कारणावरून मुलाला आपला स्वतःचा जीव गमवावा लागला.


याप्रकरणात फिर्यादी नानाभाऊ सदाशिव काळे (वय ४९, रा.पाटोदा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी व पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या पथकातील फौजदार रमेश चव्हाण , जमादार हरीभाऊ रोघें , तुळशीराम बिजुले , रामचंद्र खलसे , प्रशांत काळे , विशाल खेडकर , शेख ईस्माईल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आरोपींस अटक केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें