सेलु तालुक्यातील पारडि येथे सामाजिक न्याय दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 जून 2018

सेलु तालुक्यातील पारडि येथे सामाजिक न्याय दिन साजरा.


प्रतिनिधी.समशेर खान.दि.26/06/2018.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक मैफळ सर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर राठोड, साहेबराव लंघे, रावसाहेब लघें , संजय राठोड, राजु राठोड, रुपनर सर आदी उपस्थित होते.
           श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडली. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक ,शैक्षणिक कार्य संदर्भात एकूणच विचार मंथन झालं. यामध्ये रंजना राठोड ,काजल राठोड, राधा शेळके, मनीषा राठोड, शुभम आडे, ओम आडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
          शाळेतील शिक्षक संजय काकडे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. तसेच माननीय रुपनर सरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित असलेले माऊली राठोड यांनी पण कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले व शाळेसाठी वृक्षरोपण कार्यक्रमात वृक्षांची पूर्तता मी करतो असे आश्वासन दिले. शालेय साहित्य भेट म्हणून मी देईन असेही बोलले.मा.मैफळ सरांनी अध्यक्षीय समारोप केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज माने यांनी  केले तर आभार प्रदर्शन अजय राठोड याने केले.💐

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें