जिंतूर / निशाद आहेमद
जिंतूर तालूक्यातील मागील काही काळा पासून शेत आखाडा व शेत परिसरातून पशुधन ज्यात बैल म्हैशी अश्या पशुधनाच्या चोरीचे प्रमाण घडत असल्याने शेतकरी धास्तावला होता व पोलिसां पुढे ही आव्हान उभे राहिले होते
पण या आव्हानास स्वीकारत जिंतूर पोलिसांनी नुकतेच बैल चोर अट्टलाना पकडण्यात यश मिळवले आहे
या विषयी अधिकृत माहिती अशीं की तालुक्यातील खरदडी येथिल फियादी शेतकरी गजानन प्रकाश थिटे यांच्या शेतातून मालकीची बैल जोडी 22 जूनला दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसात गुन्हा नोंद झाला होता या वरून डी वाय एस पी अनिल घेर्डीकर व पोनी प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शना खाली हे पो का सरोदे व तुपसुंदरे यांनी आरोपी 1) समीर मोईन कुरेशी वय 25 वर्ष रा जिंतूर कुरेशी मोहल्ला 2) व आरोपी संतोष रंकिशन राठोड वय 22 वर्षे रा खरदडी या अट्टल बैल चोर गुन्हे गारांच्या मुसक्या आवळण्यास यश आले या आरोपी कडून चोरीस गेलेली 2 बैल ज्यांची किंमत 45000 रु हे त्याच्या त्याबातून हस्तगत करण्यात यश आलेले आहे पकडण्यात आलेला समीर कुरेशी या आरोपीचे संबंध स्थानिक खाटकांशी आहेत काय या बाजूचा तपास करणार असल्याची माहिती पोनी प्रवीण मोरे यांनी सागितले पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उविपोअ अनिल घेर्डीकर पोनी मोरे व कर्मचारी पुढील तपास करीत आहे या जेरबंद केलेल्या अट्टल बैल चोरट्या कडून अन्य चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
"शेतकरी बाधवाणी जागरूक राहणे गरजेचे"---- पोनी प्रविन मोरे= सध्या तालुक्यातील शेतकरी बांधवानी आपले पशुधन चोरीस जाऊ नये म्हणून या दिवसात नेहमी जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे आपली जनावरे ज्यात बैल शेळी गाई म्हशी आदी आपली वेगवेगळी पशुधने आपल्या शेतात किंवा गाव आखाड्यात ठेवताना त्या वर देखरेखी साठी आपला सालगडी किंवा आपण स्वता जागरूक राहून लक्ष्य ठेवणे सध्य काळाची गरज असून गाव परिसरात कोणी सशयीत आढळुन आल्यास त्वरीत पोलिसांना कळवण्याचे आव्हान मोरे यांनी आवर्जून केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें