मा.प्रदीप पाटील खंडापुरकर(बाबा) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

मा.प्रदीप पाटील खंडापुरकर(बाबा) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

मा.प्रदीप पाटील खंडापुरकर(बाबा) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.


आश्वी (प्रतिनिधी) :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या (वर्ष ६ वे) या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार
मा.श्री. प्रदीप पाटील खंडापुरकर (राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती) यांना देण्यात येणार आहे. आपले संपूर्ण आयुष्य भ्रष्टाचार विरोधात लढा देण्यासाठी बाबांनी खर्च केले आहे. स्वतःच्या घरापासून भ्रष्टाचार रोखण्यास सुरवात करून संघटना भारतभर उभी केली आहे. त्यांनी पूर्णवेळ भ्रष्टाचार निर्मुलन करण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. अश्विनी बिंद्रे प्रकरण, गहू व रॉकेल भ्रष्टाचार उघड करून संबंधित व्यक्तींना शिक्षा व्हावी यासाठी लढा दिला आहे. सरकारी आस्थापणात होणार भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकार  वापर करून जरब बसवली. भूखंड, जलसिंचन, जमीन, अनेक पुढारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून तडीस घेऊन गेले. गेली 35 वर्ष भ्रष्टाचार विरोधात लढत आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना जीवन गौरव व अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे व गौरव केला जाणार आहे.

अहिल्यारत्न पुरस्कार वितरण सोहळा व प्रबोधन कार्यक्रम पुणे येथे रविवार दि.१७/६/२०१८ रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक, सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे येथे दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. डॉ डी वाय पाटील साहेब
(माजी राज्यपाल बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगाल, तसेच संस्थापक डी वाय पाटील शिक्षण व अन्य समूह), वक्ते /मार्गदर्शक डॉ यशपाल भिंगे (इतिहासाचे गाडे अभ्यासक), मराठी चित्रपट कन्यारत्न ची टीम चित्रपट प्रमोशन साठी येणार (रोहन पाटील, कार्तिक दोलताडे, डी गोवर्धन, ऋतुजा वावरे, शिवाजी दोलताडे, करिश्मा वाबळे इत्यादी कलाकार उपस्थिती), मोनालीसा बागल (मला आमदार झाल्यासारखं वाटतंय गाण्यातील अभिनेत्री),  संत वाग्देव महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शक/निर्माते प्रसाद माने व टीम यांचेसह शासन, प्रशासन, सामाजिक, राजकीय, मीडिया, कला व क्रीडा, शेतकरी, कामगार , संयोजक : विजयभाऊ गोफणे,सोमनाथ देवकाते,मनोज मारकड पाटील,सचिन बोडके तसेच संयोजन समितीमधील अन्य सदस्य व बांधव
स्वागत्सुक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती , पुणे- महाराष्ट्र,सक्षम लोकविकास फाउंडेशन इत्यादी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें