अजिंठ्यात ४० वर्षीय अनोळखी महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

अजिंठ्यात ४० वर्षीय अनोळखी महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली.

अजिंठ्यात ४० वर्षीय अनोळखी महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली.



 अजिंठा: प्रतिनिधी: मुनीर पठाण  दि १७... अजिंठा गाव जवळील जळगाव औरंगाबाद महामार्गावरील वाघूर नदी जवळ एक अनोळखी महिला गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत  रविवारी सकाळी ७ वाजता आढळून आली.

 त्या महिलेवर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून घाटीत दाखल करण्यात आले. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी त्या महिलेचे छायाचित्र व्हाट्स अँप वर पाठवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. पण रविवारी रात्री उशिरा पर्यंत ओळख पटली नव्हती. पोलिसांचा या अनोळखी महिलेच्या नातेवाईकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिलेचा ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्या महिलेचा फोटो व्हाट्स अँप वर व्हारल केला. दरम्यान या महिला विषयी कोणाला काही माहिती असल्यास अजिंठा पोलिसांची संपर्क साधावा.
छायाचित्र... हीच महिला अजिंठा वाघूर नदीजवळ रक्तबंबाळ गंभीर अवस्थेत आढळली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें