धाडस जिवावर बेतले, पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

धाडस जिवावर बेतले, पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू.

धाडस जिवावर बेतले, पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू.


लातूरमधील शिरुरअनंतपाळ ते नागेवाडी रस्त्यावर मृत्यूचा थरार लोकांनी अनुभवला. पुलावरुन पाणी वाहत असताना पाण्यातून जाण्याचे धाडस एकाच्या अंगलट आले. पाण्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. प्रकाश सोमनाथ जळकोटे वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. शिरुरअनंतपाळ ते नागेवाडी रस्त्यावर घरणी नदीवरील पुलावरुन पाणी वाहत होते. तरीही प्रकाश जळकोटे यांनी वाहत्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा निर्णय जीवावर बेतला. उपस्थितांनी विरोध करूनही प्रकाश यांनी वाहत्या पाण्यातून जाण्याच निर्णय घेतला आणि एकप्रकारे मृत्यूला आमंत्रणच दिलं.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें