कौसडी परिसरात पाऊसाची हजेरी.खरीप पेरणीसाठी शेतक-यांची लगबग सुरू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 जून 2018

कौसडी परिसरात पाऊसाची हजेरी.खरीप पेरणीसाठी शेतक-यांची लगबग सुरू.

संग्रहित



कौसडी प्रतिनिधी

जिंतुर तालुक्यातील कौसडी परिसरात पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला  आहे
मृगनक्षत्रात प्रारंभी काही दिवस पाऊसाने हजेरी लावुन समाधानी केल्या नंतर शेतक-यांनी काही प्रमाणात कापुस लागवड केली होती त्यानंतर पाऊसाने तब्बल दहा दिवसाची दडी मारून शेतक-यांचा जिव टांगनीला लावला होता.
खरीप हंगामातील पीक पेरणीसह कापुस  लागवडीची पाऊसा अभावी शेतक-यांना चिंता लागुन असतांनाच काही प्रमाणत लागवड केलेल्या कापुस पीकाला जीवदान व खरीप पेरणी योग्य पाऊसाने दिनांक 26 जुन रोजी  हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे
गेल्या वर्षी खरीपसह रब्बी हंगामातील पीका पासुन शेती खर्चा पुर्तेही उत्पादन हाती न आल्याने  शेतकरी वर्गाच्या डोक्यावरचा कर्जाचा भार जास्तीचा वाढला जाऊन आर्थिक परिस्थिती बीकट बनली गेली आहे तरहीपन या वर्षी कमकुवत परिस्थिती आसतानाही शेतक-यांनी खरीप हंगाम पेरणीसाठी खाजगी सावका-यांच्या दारोदारी जावुन विनंती करून पैसे आनुन महागड्या  कीमतीचे रासायनिक खते व बी-बीयाने खरीदी करून काळ्या आईची ओटी भरली आहे
या मुळे शेतक-यांन या वर्षी खरीप हंगामातील पीका पासुन भरगोस उत्पादन मीळेल ही आशा लागुन आहे मात्र शेतक-यांचे नसीब निसर्गावरच अवलंबुन  आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें