मानवत येथील शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

मानवत येथील शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर.

मानवत शहरात राज्य भरात नव्हे असा छत्रपती शिवरायांचा पुतळा होईल- प्रमोदजी कांबळे.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत शहरातील छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे नियोजित जागेच्या सुशोभीकरणाच्या काम प्रगतीपथावर असुन दि.२१ जुन रोजी  जगप्रसिध्द  शिल्पकार राष्ट्रपती पदक प्राप्त प्रमोदजी कांबळे यांनी मानवत येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजीत जागेवर पुतळासाठी भेट दिली व मानवत शहरात राज्य भरात नव्हे असा छत्रपती शिवरायांचा पुतळा होईल असे प्रमोदजी कांबळे यांनी यावेळी सांगितले या वेळी युवा नेते डॉ. अंकुश लाड ,नगर अभियंता अनवर शेख,तौसीब खान ,राणा संजय नाईक ,सखाउदीन गुत्तेदार आदि उपस्थित होते शहरात अनेक वर्षापासुन शिवप्रेमी  जनतेकडुन छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा व्हावा अशी मागणी होत होती या मागणीचा विचार करुन मा.आमदार मोहन फड व युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणविस याच्याकडे निधीसाठी प्रयत्न करुन   छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या नियोजित जागेच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये निधी मंजुर करुन आणले होते  व या कामाचे भव्य असे भुमीपुजन शिवजयंतीचे औचीत्य साधुन   दि.१९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागा येथे आमदार मोहन फड याच्या शुभहस्ते उदघाटनही करण्यात आले होते.या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असुन काम लवकरच पुर्ण होऊन येथे छञपती शिवाजी महाराजाचा आश्वरुढ पुतळा उभारण्यात येणार असल्याने शिवप्रेमी जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें