पिक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन-शेतकरी संघटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

पिक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन-शेतकरी संघटना.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२२जून २०१८
सोनपेठ तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांना पिक विम्यापासुन वंचित ठेवले असुन या शेतकऱ्यांचे हक्काचे दहा कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा लाक्षणिक उपोषणाचा समारोप करतांना शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तालुक्यातील दहा हजारहुन अधिक शेतकऱ्यांना रिलायन्स विमा कंपनी, कृषी विभाग व महसुल प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दहा कोटी रुपयाच्या नुकसानभरपाई पासुन वंचीत राहावे लागले. सोयाबीनचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडे तेरा हजार रुपये मिळण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोनपेठ तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाची सुरवात अॅड. गजानन तोंडगे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. या वेळी विश्वंभर गोरवे यांनी प्रास्ताविक करुन सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विम्याबाबत परिस्थीती विषद केली. या वेळी रामेश्वर भोसले, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान पिक विमा संघर्ष समितीचे डॉ.सुभाष कदम यांनी पिक विम्या बाबत सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती सांगुन समितीच्या वतीने २६ जुन मंगळवार रोजी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगुन या उपोषणात सोनपेठ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. तर उपोषणाचा समारोप करतांना शेतकरी संघटनेच्या सुधीर बिंदु यांनी तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांना पिक विम्यापासुन वंचित ठेवले असुन या शेतकऱ्यांचे हक्काचे दहा कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला. पेरणीचे दिवस असतांनाही शेतकऱ्यांनी या आंदोलनास चांगलाच प्रतिसाद दिला. या आंदोलनासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी माधव जाधव, सोमनाथ नागुरे, माऊली जोगदंड, आण्णा जोगदंड, अंगद काळे, चंद्रकांत देशपांडे, राजेश कदम, मारोती सपकाळ, सुधाकर मुंडे, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, पांडुरंग जोगदंड, उध्दव जोगदंड, किशन मुलगीर, प्रल्हाद गांगर्डे, सुंदर जोगदंड, ज्ञानेश्वर जोगदंड,  कृष्णा पिंगळे, गणेश पाटील, माणिक काळे, शिवसेनेचे मधुकर निरपणे, रंगनाथ रोडे, अशोक यादव, भाजपाचे महादेव गिरे, रंगनाथ सोळंके, काँग्रेसचे ईरशाद कुरेशी, प्रभाकर सिरसाट, मारोती रंजवे, अशोक तिरमले, सतीश मुळी यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड व नायब तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तात्काळ विमा वितरीत करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे अश्वासन देऊन उपोषण सोडवले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें