दोन वळयासह घर जळून खाक सेलू तालुक्यातील खेर्डा येथील घटना .
सेलू (प्रतिनिधी)
सेलू तालुक्यातील खेर्डा येथील प्रखर उष्णतेमुळे अचानक वळईला आग लागली क्षणात या आगीने रौद्ररूप धारण करून दुसरी वळई व एक राहते घर या आगीमध्ये भस्मसात झाले पेरणी चे बी बियाणे , अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले यामुळे पांडुरंग बनसोडे यांचा संसार उघड्यावर पडला असून ही दुर्दैवी घटना 3 जून रोजी दुपारी ३ वा. सुमारास घडली वेळीच अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला .
या घटनेची माहिती अशी की तालुक्यातील खेर्डा येथील पांडुरंग हरीभाऊ बनसोडे यांचे घर पूर्व दिशेला आहे घराजवळील त्यांच्या वळई ने 3 जून रोजी दुपारी ३वा. सुमारास अचानक पेट घेतला या आगीने रौद्ररूप धारण केले या आगीमुळे ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ उडाली . प्रत्येकाने आपल्या घरावर पाणी मारले तर काहीजणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला परंतु ही आग वाढतच गेली या आगीमध्ये श्रीरंग आप्पाराव खुळे यांची वळई जळून खाक झाली त्यानंतर पांडुरंग बनसोडे यांचे तीन खोल्या असलेले राहते घर या आगीमध्ये जळून खाक झाले या घरांमध्ये पेरणीतील बी-बियाणे अन्नधान्य कपडे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे राख झाली सरपंच विजय भुजबळ यांनी या घटने बाबतची माहिती सेलू न.प. चे अग्निशामक दल यांना दिली अर्ध्या तासामध्ये अग्निशामक दलाची गाडी खेर्डा येथे दाखल झाली त्यानंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्यामुळे गावातील पसरणारी आग मात्र आटोक्यात आल्यामुळे अनर्थ टळला घटनेची माहिती कळताच तलाठी सरस्वती राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सदर घटनेचा पंचनामा केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें