आ.मोहन फड यांच्या सहकार्याने १०४ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 जून 2018

आ.मोहन फड यांच्या सहकार्याने १०४ रुग्ण उपचारासाठी मुंबईस रवाना.

आ.मोहन फड यांच्या सहकार्याने १०४ रुग्ण उपचारासाठी  मुंबईस रवाना.

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२०: पाथरी विधानसभाचे आमदार श्री.मोहनभाऊ फड यांच्या वतीने पाथरी मतदारसंघातील आज दि.२० जुनरोजी विविध आजाराचे १०४ रुग्ण अधिक उपचारासाठी मुंबई येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई येथे मानवतरोड येथून तपोवन एक्सप्रेसने रवाना करण्यात आले. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा माननारे पाथरी मतदारसंघाचे आमदार श्री.मोहनभाऊ फड यांच्या सहकार्याने
 पाथरी मतदारसंघातील मौजे खरवडे किनोला ,थंडी ऊकडगाव ,या गावातून मोती बिंदुचे ६२ रुग्ण व गर्भ पिशवी चे १० रुग्ण व इतर आजाराचे३२ असे एकुण रुग्ण  १०४ रूग्ण मुंबई येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई येथे मानवतरोड येथून तपोवन एक्सप्रेसने रवाना करण्यात आले.मा डॉ विजय पाटील साहेब व मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री.ओमप्रकाशजी शेटे साहेबांच्या सहकार्याने या रुग्णांवर उपचार होणार आहे यावेळी आ.मोहनभाऊ फड ,डॉ. अंकुश लाड,गिरीशजी कत्रूवार,माणिकराव खरोडे, माधवराव भंडारे,गणेश यादव,आरोग्यसेवक पप्पु नखाते  आदी  उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें