योगेश ढवारे यांच्या घालमेल कवितेला साहित्य रसिकांची उत्स्फूर्त दाद.पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन.
सेलू प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड व जीवन गौरव शैक्षणिक मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन निगडी प्राधिकरण पुणे येथील श्री.के.बा.विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक तथा कवी योगेश ढवारे यांनी सादर केलेल्या घालमेल या शेतकरी बांधवाच्या मर्मावर स्पर्श करणार्या रचनेने उपस्थित साहित्य रसिकांच्या टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून म.सा.प.पिपरी चिंचवड चे ज्येष्ठ साहित्यिक तथा अ.भा.मराठी साहित्य संमेलन बडोदा येथील कविकट्टा संयोजक राजन लाखे,ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर,म.सा.प पिंपरी चिंचवड कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, जीवन गौरव संपादक रामदास वाघमारे, सहसंपादक तथा संयोजक डी.बी (शब्दधन) शिंदे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळ सत्रात संमेलन उद्घाटन व परिसंवाद या नंतर दुपार सत्रात हे कविसंमेलन रंगले.यात राज्यभरातून आलेल्या 60 कविंनी दर्जेदार अशा रचना सादर करून वातावरण काव्यमय केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें