आमठाणा येथे विविध विकास कामांचे उदघाटन ;
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी) 09सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दलित वस्तीत सिमेंट रस्त्याच्या कामांचे व नाली गटार बांधकामाचे असे एकूण चार लाख एकाहत्तर रुपयांच्या कामांचे उदघाटन करण्यात आले.
आमठाणा ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता मोहीम अंतर्गत गावात 215 स्वच्छता गृहाचे बांधकाम यशस्वीपणे राबवून नागरिकांना प्रत्येकी 12000 प्रमाणे देण्यात आले. व ज्यांनी बांधकाम केले परंतु त्यांना रक्कम मिळाली नव्हती अशा लाभधारकांना आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. ग्रामनिधीतून बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पणही आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,कौतिकराव मोरे , रफिक देशमुख, हरिदास दिवटे,अर्जुन गाढे, संजय मुरकुटे,रोहिदास पवार,रघुनाथ मोरे, सरपंच - संजय बन्सोड,उपसरपंच - सुनंदा भागवत मोरे,ग्रामसेवक ढाकरे,शेवंतराव मोरे,एकनाथ वाघ,मिनाबाई चौधरी,एकनाथ तायडे, बाबासाहेब देशमुख,राणुबा शिंदे,राम बखले,सोनाजी गाडेकर,रविंद्र राजपूत,मोईन शेठ,सुभाष लोखंडे,नामदेव कदम आदिंसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें