आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत.
सेलु जितूंर विधानसभा प्रमुख तथा जि प गट नेते राम पाटील यांचा पुढाकार.
जिंतूर प्रतिनीधी
तालुक्यातील सावळी येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व पेरणीसाठी लागणाऱ्या बि बियाणे खरेदीस पैसे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 जून रोजी घडली होती याची तत्काळ दखल घेत शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष तथा जि प गटनेते राम पाटील यांनी त्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना रोख 10 हजाराची आर्थिक मदत 4 जून रोजी केली.
या बाबत अधिक माहिती तालुक्यातील सांवळी येथील शेतकरी विट्ठल सुधाकर घुगे वय -24 वर्षे हे वडिलाचा निधनानंतर वडिलोपार्जीत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मागील वर्षी झालेल्या दुष्काळामूळे जेमतेम उत्पन्न झाले होते परंतु ते उत्पन्न कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पण पुरले नसल्याने ते नेहमी नैराश्यात राहत असत त्यातच 1 जून रोजी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पेरणीसाठी लागणारे बि बियाणे कसे खरेदी करावे याच विवंचनेत होते घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरून न्याहारी करून शेतात कामाला चाललो असे सांगून गेले होते परंतु दुपारचे जेवण करण्यास घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनी शेतात पाहिले असता शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले या घटनेची माहिती मिळतात राम पाटील यांनी तत्काळ कुटुंबाचा घरी जाऊन सांत्वन केले व रोख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांनी सामाजीक बांधिलकी जपली आहे यावेळी त्यांच्या सोबत योगानंद नागरे, उपसरपंच रामप्रसाद कंठाळे,मधुकर सनईकर,लखन माने,बालाजी घुगे,नारायण घुगे,कैलाश घुगे,दिनकर घुगे,भारत घुगे,गणेश घुगे,मधुकर घुगे गावातील गावकरी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें