मौजे दुधगाव ता.जिंतूर येथे 33 केव्ही उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

मौजे दुधगाव ता.जिंतूर येथे 33 केव्ही उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न.

मौजे दुधगाव ता.जिंतूर येथे 33 केव्ही उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा  आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न.


जिंतूर (पठाण अजमत):
दि.०३/०६/२०१८ रोजी मौजे दुधगाव ता.जिंतूर येथे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वीजेअभावी आसेगाव, कौडगाव, दुधगाव या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असूनही त्याचा लाभ घेता येत नव्हता. सदर तिन्ही गावे यापूर्वी बोरी उपकेंद्रावर अवलंबून होते जे पुरेसे नव्हते. स्वतंत्र उपकेंद्रासाठी शेतकरी व आ.विजय भांबळे यांनी महावितरण ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता.  या पाठपुराव्याला यश मिळाले.

मौजे दुधगाव ३३ केव्ही उपकेंद्रासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत २ कोटी ७ लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली व काम पूर्ण झाले. या उपकेंद्राचे लोकार्पण आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते २८ मे रोजी संपन्न झाला. सदर उपकेंद्राद्वारे बोरी परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा होणार असल्याने आसेगाव, कौडगाव, दुधगावसह अनेक गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

या कार्यक्रम प्रसंगी जि.प.सदस्या शालिनीताई राऊत, पं.स. उपसभापती विजय खिस्ते, रा.कॉ. तालुकाध्यक्ष मनोज थिटे,अभिनय राऊत, कृष्णा राऊत व गावकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें