सेलू नगर परिषदेची विविध भागात साडेसात ते आठ कोटी रुपयांची कामे चालू.
प्रतिनिधी
सेलु शहरात सध्या नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामे केली जात आहेत त्यापैकी बहुतांश कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होत असलेली कामे निवीदे नुसार होत नसल्यामुळे त्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे होत असलेल्या कामाची प्रत निकृष्ट प्रतीची असून सिमेंटच्या कमी वापर करणे रस्त्याची जाडी कमी करणे रस्त्यामध्ये स्टील न वापरणे सिमेंट व गिट्टीच्या आयोजि मातीचा जास्त वापर करणे ह्या गोष्टीमुळे त्यामुळे संबंधित कामाचा दर्जा राखला जात नाही या सर्वच कामाची चौकशी गुणनियंत्रण विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या तक्रारीत डासाळकर यांनी म्हटले आहे की सेलु शहरात सध्या वैशिष्ट्यपूर्ण, नगरोत्थान, दलितेतर, यु डी 6, आदी विविध निधीतून जवळपास साडे साडेसात ते आठ कोटी रुपयांची कामे मोठ्या प्रगतीपथावर असून या सर्वच कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कुठलीच कामे निविदेनुसार केली जात नाहीत तसेच सदरील कामात पाहिजे तेवढ्या सिमेंट चाही वापर होत नाही तसेच यामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टील किंवा लोखंडाचा दगडाचा वापरही अगदी कमी प्रमाणात केला जात असून मातीचा मात्र भरमसाठ वापर होताना दिसत आहे यामुळे सदरील कामे निकृष्ट प्रतीची होत असून या सर्व कामांची चौकशी गुणनियंत्रण विभागाकडून होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच सदरील कामे करणारा कंत्राटदार अध्यक्षाच्या मर्जीतील असून काही कंत्राटदाराच्या नावा अडून नगरसेवकच कामे करत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे या कामामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या याशिवाय शादी खाणे इत्यादींची विकास कामे होत असून या सर्वच कामांचा दर्जा राखला जावा ही किमान अपेक्षा नागरिकांची असून कामे व्यवस्थित केल्यास केलेल्या कामाचे आयुष्य वाढेल मात्र मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष हे सर्वच नगरसेवकांना कसे सांभाळता येईल याकडे जास्त लक्ष देत आहेत वरील सर्वच बाबींची तात्काळ चौकशी करून सदर कामाची देयके थांबवावीत व शासकीय निधीचा गैरवापर थांबवुन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें