सेलू येथील नुतन कन्या प्रशाला व ओम स्किन हेअर अॅन्ड लेझर क्लिनिकच्या वतीने त्वचा, गुप्तरोग व बदलत्या जीवन शैलीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची शालेय विद्यार्थीनींना जाणिव व्हावी या हेतूने शुक्रवारी सकाळी मार्गदर्शन कॅपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक सुरेश रणखांबे, दंतरोग तज्ञ डाॅ. प्रिती मेहता, पर्यवेक्षक अशोक वानरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवन जगत असताना तरूण वयात व म्हातारपणी सुद्धा सौंदर्य कसे टिकवून ठेवायचे याचे याबद्दल मार्गदर्शन करताना डाॅ. मेहता म्हणाले की, हल्ली बाजारात त्वचेच्या आजारावर लावण्यासाठी मलमांच्या फसव्या जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टिराॅईड असल्यामुळे त्वचेवर अनिष्ट परिणाम होतात. असे मलम लावल्याने त्वचेचे ईपीडर्मिस व डर्मिस पातळ होऊ लागतात व त्वचेखालील रक्तवाहीण्या दिसू लागतात. त्वचेवर मुरूम येऊन त्वचा हुळहूळी होते व चेहरा लाल दिसू लागतो. मुलींच्या चेहर्यावर अनावश्यक केसांची वाढ होते. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच बाजारात गजकरण विरोधी स्टिराॅईड मलमे आलेली आहेत. ही मलमे लावल्यास गजकरण ठिक होण्याऐवजी सर्व अंगावर पसरते. त्वचा ताणली जाते व त्यामुळे व्रण पडतात. असे व्रण जांगेत व मांडीवर घेऊन ते कायम राहतात. यातून बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे त्वचेच्या आजारावर स्टिराॅईड मलमे वापरू नका असे आवाहन डाॅ. आशिष मेहता यांनी केले. यावेळी 5 वी ते 10 वी वर्गातील 1600 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सहशिक्षीका किर्ती राऊत यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें